ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट कंपनी तर्फे प्रत्येक रविवारी रोडची स्वच्छता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
माणिकगड सिमेट कंपनी च्या गेट पासून ते रामकृष्ण हॉटेल पर्यंत च्या रोड वरती डस्ट साफ करणारी मशीन फिरवून रोड ची सफाई अल्ट्राटेक सिमेंट,माणिकगढ कडून दर रविवार करण्यात येत आहेत.
या रविवारी तर मार्केट रोड वरती सुद्धा पाण्याचा छिडकावं करून रोड ची स्वछता केलीत.
दिलेल्या आश्वासनावर खरे उतरत माणिकगढ सिमेंट कंपनी रोड ची स्वच्छता नियमित करीत आहेत.
या कार्याकरीता पर्यावरण विभाग व ऍडमिन कर्मचारी सतत मेहनत घेत आहेत.