ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धोत्रा नंदाई सह परिसरातील 14 गावांना संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पा मधून पाणी मिळणार!

पालकमंत्री मकरंद पाटील,आमदार मनोज कायंदे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यातील जीवन वाहिणी असलेल्या खडक पूर्णा नदीवर असलेल्या संत चोखासागर धरणाच्या उपकालव्यांच्या लाभ क्षेतात्रील परिसरातील धोत्रा नंदाई सह 14 गावांना सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या संदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबंधित विभागाला दिल्या आहेत. या संदर्भात आमदार मनोज कायंदे यांनी या विषयासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून दोन दिवसांपूर्वी त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.मकरंद पाटील यांचे समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली होती.

खडक पूर्णा धरणाच्या उपकालव्यांमधून जवलपास 1673 हेक्टर जमीनीवरील सिंचनाचा प्रश्न विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या काही ठरावांमुळे निर्माण झाला होता ,वरील क्षेत्र वगळण्याची सबंधित लाभधारकांनी मागणी असल्याने हा ठराव करण्यात आला मात्र यामुळे परिसरातील गावांना पाणी जवळ असून देखील मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.दरम्यान,याच प्रश्नावर अभ्यास करून आमदार मनोज कायंदे यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली,त्यानंतर त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या सोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना समस्या सांगितली. 2008 पासून या विषयासाठी शेतकरी व डावा कालवा कृती समिती यांच्या वतीने सातत्याने आंदोलने,मोर्चे व उपोषण या मार्गाने मागणी करीत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. सोबतच या विषयीचे पत्र देऊन शेतकऱ्यांचा हा महत्वाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ या विषयाची गंभीर दखल घेवून सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कैलास नागरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

   शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नांसाठी लढणारा युवा शेतकरी म्हणून कैलास नागरे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.अनेक आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी सरकारला प्रत्येकवेळी समस्या सोडविण्याची मागणी केली.दुर्दैवाने कैलास यांनी याच प्रश्नांसाठी आपली जीवन यात्रा संपविली त्यांनी हाती घेतलेले काम आम्ही पूर्ण करून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहणार असल्याचे आमदार मनोज कायंदे यांनी म्हटले होते .या विषयी सातत्याने पाठपुरावा करून सरकार कडून हा विषय नक्कीच मार्गी लावून स्वर्गीय कैलास नागरे यांचे याच प्रश्नांसाठी दिलेले बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही अशी दिलेली ग्वाही सत्यात उतरवीत असल्याचे आमदार मनोज कायंदे यांच्या प्रयत्नातून दिसून येत आहे. सदर बैठकीला माजी जि. प.सदस्य श्री भगवान मुंडे, श्री शिपणे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

 धोत्रा नंदई, अंढेरा व इतर 14 गावांना संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी उपलब्ध झाले तर या गावातील सिंचनाचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटेल व याचा फायदा या परिसरातील समस्त नागरिकांना होईल असे आमदार श्री मनोज कायदे. यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये