माणिकगड सिमेंट वर जप्तीची धडक कारवाई करणाऱ्या मुख्याधिकारी धुमाळ यांची बदली
बदली रद्द करण्याची शिवसेना उ बा ठा तालुका प्रमुख डॉ. प्रकाश खणकेचीं मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी च्या औद्योगिक नगरी गडचांदूर स्थित माणिकगड सिमेंट वर्क्स वर नगर परिषद चे मुख्याधिकारी येंमाजी धुमाळ यांनी सोमवार ला धडक कारवाई करित जप्तीची कारवाई सुरू केली होती. गुरुवार ला अचानक त्यांचा जागेवर नगरपालिका कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर येथील मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांची नियुक्ती झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
नगर परिषद गढ़चंदूर ची बहु प्रतिक्षित पहिली कर आकारणी से काम वर्ष 2020 पासून शुरू आहे पांच मुख्य अधिकारी बदलून सुध्दा कर आकारणी पूर्ण झाली नाही. अखेर मुख्य अधिकारी डॉ सूरज जाधव यांचा कार्यकाळात आक्षेपांचीं जनसुनावणी होऊन नवीन कर आकारणी लागू करण्यात आली. माणिकगड सिमेंट तर्फे तब्बल 1061 आक्षेप नोंदवून कर आकारणी मध्ये त्याच्या वर लावलेल्या १६ कोटी रुपये कराला विरोध केला होता. परंतु जन सुनावणी निर्णय अधिकारी गोडबोले यांनी नियमांचा हवाला देत काही ठिकाणी फेरमोजणी व फेर मूल्यांकन चे आदेश देत कंपनी चे आक्षेप रद्द केले होते.
नगर परिषद गडचांदूर ने तात्काळ कंपनी मध्ये आदेशित ठिकाणी फेरमोजणी करित माणिकगड सिमेंट वर्क्स वर १५ कोटी ५९ लाख कर निश्चित केला. त्याच दरम्यान मुख्याधिकारी डॉ. सूरज जाधव यांची बदली होऊन येमाजी धुमाळ रजू झाले. पुढे विधानसभा निवडणूक लागल्याने प्रकरण थंड झाले.
सोमवार दिनांक १७ मार्च २०२४ ला सकाळी १० वाजता नवीन मुख्याधिकारी येमाजी धुमाळ यांनी आपल्या अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांना व काही पंच सोबत घेत कंपनी च्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक देत जप्ती व टाळेबंदी ची कारवाई सुरू केली. नियमानुसार आधी नोटिस दिली गेली असतानी कंपनी ने कर न भरल्याने अल्ट्राटेक सिमेंट च्या अधिकारी वर्गाची मोठी तारांबळ उडून प्रकरण वरिष्ठ स्थरावर मुख्यालय मुंबई पर्यंत पोहोचले. अल्ट्राटेक सिमेंट ने तत्काळ सूत्रे हलवित जिल्हा प्रशासनास हस्तक्षेपाची मागणी केली. मुख्याधीकारी धुमाळ यांनी संपूर्ण कर भरण्याची मागणी रेटल्याने व मुख्य दारावर वाहतूक बंद केल्या मुळे धसका घेत काही कर भरण्याची तयारी दर्शविली.
अखेर उपविभागीय अधिकारी कु कश्मिरा संखे ( भा. प्र. से. IAS) यांच्या उपस्थितीत कंपनी कडून ४ कोटी ५७ लक्ष रुपये भरून टाळेबंदीची कारवाई टाळण्यात आली.
माणिकगड सिमेंट कंपनी ची ओळख ही दबंग कंपनी म्हणून असून प्रदूषण, अपघात, आदिवासी जमीन प्रकरणामुळे नेहमीच चर्चेत असते.
पहिल्यांदाच कुणी हिम्मत करून कंपनी वर धडक देत कारवाई केल्यामुळे परिसरात चर्चेला पेव फ़ुटले. अनेकांनी झालेल्या कारवाई चे समर्थन करित मुख्याधिकारी धुमाळ यांचे अभिनंदन केले.
डॉ प्रकाश खनके तालुकाप्रमुख कोरपना शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिव आरोग्य सेनेचे राजुरा विधानसभा क्षेत्राचे समन्वयक सुरेश खोबरकर यांनी मुख्याधिकारी धुमाळ साहेब यांचे अभिनंदन करून कामाचे कौतुक केले आहे . शासनाने त्यांची मुख्याधिकारी नगर परिषद गडचांदूर म्हणून नियुक्ती कायम ठेवण्याची मागणी शिवसेना (उ बा ठा) तर्फे करण्यात आली आहे.
सध्या सदर कर आकारणी प्रकरण जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कडे सुनावणी साठी गेल्याचे कळते. नव नियुक्त मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांत काय भूमिका घेतात या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.
माणिकगड सिमेंट कंपनी वर कडक कारवाई केल्यामुळे धुमाळ साहेब यांची बदली करण्यात आल्याची चर्चा परिसरात पसरली आहे.
एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाचा विषय विधान सभेत गाजत असून कडक कारवाई ची मागणी माजी पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार व आमदार देवराव दादा भोंगडे करीत आहेत त्यांच वेळेस प्रशासनाने दबंग कंपनी वर दंडात्मक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केल्यामुळे ते या विषयात काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
माणिकगढ़ सीमेंट कंपनी वर तत्कालीन ग्राम पंचायत ने 17 लक्ष्य कर लागु केला होता व तो २००९ पासून कायम आहे. २०१४ मध्ये नगर परिषद झाली. कंपनी ने जुन्या कारखान्याचे नुतनीकरण करून व नवीन सेकंड प्लांट उभारणी करून उत्पादन तिप्पट चौपट केले तरीही जुनेच कर भरीत आहे.
मुख्याधिकारी धुमाळ यांनी केलेल्या कारवाई चे आम्ही स्वागत करतो आणि त्यांची पुन्हा गडचांदूर येथे मुख्याधिकारी पदी पुनर्स्थापना करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
डॉ. प्रकाश खणके
तालुका प्रमुख कोरपणा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)