ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वन्यप्राण्यांच्या शिकार प्रकरणातील आरोपींना अटक

दोन वर्षांपासून होते फरार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत नोंद वनगुन्हा अन्वये वन्यप्राणी रानटी डुक्कर व ससाची सावली वनपरिक्षेत्रातील उपवन पाथरीतील खानाबाद येथील शिकार प्रकरनातील मुख्य आरोपी घटना दिनांक 13 ऑगस्ट 2023 पासून फरार असलेले राजेंद्रसिंग जरनेलसिंग बावरी वय-30 वर्ष रा. मुडझा त. ब्रह्मपुरी जी. चंद्रपूर यांना मुडझा येथून व श्री. शत्रूगन वसंत महाडोळे वय -32वर्ष रा. बल्लारपूर पो. मुडझा त. ब्रह्मपुरी जी. चंद्रपूर यांना बामणी ,ता. जि. गडचिरोली येथून आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी सावली वनपरिक्षेत्राचे पथकाने सिने स्टाईल पकडण्याची कारवाई केली.

सदरची कारवाई श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांच्या नेतृत्वात श्री नंदकिशोर पाटील, क्षेत्र सहाय्यक पाथरी, श्री सुरेंद्र सिंग वाकडोत क्षेत्र सहाय्यक राजोली, श्री रवी सूर्यवंशी क्षेत्र सहाय्यक व्याहाड आणि वनरक्षक सिरसी, श्री महादेव मुंडे, श्री खेमराज गोडशेलवार, वनरक्षक पाथरी, श्री श्रीराम आदे, वनरक्षक राजोली, श्री एकनाथ खुडे, वनरक्षक गायडोंगरी व अतिन मानकर, घनश्याम बनसोड, किशोर काटपलीवार वाहन चालक, नागेश बद्दमवार PRT बोथली यांनी यशस्वी रित्या पार पाडली. पुढील तपास श्री प्रशांत खाडे विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व श्री विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली हे करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये