कोरपणा बस स्टॉप येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
स्वराज्याचे अधिपती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 17 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता सोमवार कोरपना बस स्टॉप येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कोरपना यांच्यामार्फत महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कोरपना तालुकाप्रमुख डॉक्टर प्रकाश खनके शहराध्यक्ष मोबीन मोहीन बेग,शिव आरोग्य सेनेचे राजुरा विधानसभा क्षेत्राचे समन्वयक सुरेश खोबरकर, सुरज भोयर,शेख रहीम शेख,अमोल पंदीलवार, संदीप भोयर, अनिल खोबरकर,अरून कुकडे,गणेश गोडे, श्रीधर खामनकर, नगरपंचायत चे उपाध्यक्ष इस्माईल शेख युवा सेनेचे तालुकाप्रमुख अंकुश वांडरे रहीम शेख, देविदास तुराणकर, मिन्नत पेटकर महाराज तसेच गावातील नागरिक व बाहेरगावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते