पाणी टंचाई निवारणार्थ कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही : आमदार मनोज कायंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुक्यात संभाव्य पाणीटंचाई जाणू नये आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यासाठी गावनिहाय पाणीटंचाई आढावा सभा नऊ मार्च रोजी देऊळगाव राजा येथे संपन्न झाली ,यावेळी आमदार मनोज कायंदे बोलत होते सविस्तर वृत्त असे की, तालुक्यात पर्जन्यवृष्टी बऱ्यापैकी असली तरी अंढेरा महसूल मंडळात पाणीटंचाई फेब्रुवारीतच जाणू लागली आहे.
यासाठी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी तालुक्यातील साठ गावे तसेच मतदार संघातील चिखली तालुक्यातील 22 गावांचा गावनिहाय आढावा घेतला. बहुतांश गावामध्ये जलजीवन मिशन आणि इतर पाणीपुरवठा योजनेचे कामे अधिकाऱ्यांच्या तसेच संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे छोट्या छोट्या त्रुटी टाकून चाल ढकलपणा सबंधित अधिकारी करत होते. या संदर्भात त्यांनी गाव निहाय निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आपले अहवाल बनवून आणले होते. यावर आमदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. फक्त कागदपत्रे दाखवून आपल्याला पाणीटंचाई निवारण करता येणार नाही प्रत्येक गावासाठी शासनाने पाणीपुरवठा संदर्भात केलेल्या उपाययोजना ग्राम पातळीवर व्यवस्थित चालू आहे का याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असते.
परंतु संबंधित अधिकारी नेहमीप्रमाणे उत्तरास उत्तर देऊन मोकळे होत होते परंतु आमदार कायंदे यांनी गाव निहाय आढावा घेतल्यानंतर संबंधित अधिकारी आणि ग्राम पातळीवर काम करत असणाऱ्या कर्मचारी सुद्धा ग्राम पातळीवर संबंधित पाणीटंचाई संदर्भातील योजना सक्रिय राबवत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यामध्ये आठ गावांसाठी कोट्यावधी रुपयाची योजना राबविण्यात येत आहे संबंधित योजनेचा कालावधी होऊन गेलेला असताना सुद्धा अधिकारी त्यावर गांभीर्याने घेत नसल्याने संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यावरफौजदारी कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी आमदार कायंदे यांनी दिले. मतदार संघात पाणीटंचाई संदर्भात कोठे कोठे प्रस्ताव सादर केलेले आहे आणि काय स्थितीत आहे याचा संपूर्ण अहवाल येथे 48 तासात सादर करावा अशा प्रकारचे निर्देश सुद्धा आमदार मनोज कायंदे यांनी दिले.
यावेळी वैशाली डोंगर जाळ तहसीलदार, मुकेश माहोर गटविकास अधिकारी, चंद्रकांत नागरे उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, एस एम रायबोले उपविभागीय अभियंता,जीवन प्राधिकरण दे राजा, संदीप शेटे उपविभागीय अभियंता महावितरण दे राजा, भगवान कच्छवे तालुका कृषी अधिकारी, यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव मुंडे, संतोष खांडेभराड, प्रा दिलीप सानप, गणेश डोईफोडे, भगवानराव नागरे, दिलीप खरात, प्रदीप वाघ, शुभम कायंदे, अक्षय ठाकरे यांच्यासह तालुक्यातील ग्राम पातळीवरील ग्रामसेवक, सरपंच आणि गावकरी हजर होते.