ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीनिवास फायबर्स जिनिंगमध्ये बालकामगारांचे राबणे कायम!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- बालकांचे हक्क, शिक्षण हक्क कायदा, बालकामगारविरोधी कायदा या सगळ्यांची पायमल्ली करत कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना अंतर्गत श्रीनिवास फायबर्स जिनिंग मध्ये लहान मुलाकडून काम करून घेतले जात आहे. जिनिंग मध्ये येणाऱ्या वाहनातून कापूस खाली करण्यासाठी चक्क बालमजूरांचा वापर सुरू असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.

दहा ते बारा वर्षे वयाच्या लहान मुलांना कमी मजुरी देऊन त्यांच्याकडून वाहन खाली केले जात आहे. कापूस खाली करण्यासाठी शेतकऱ्यांकडून साडेसहाशे रुपयांची कपात केली जाते व बालमजूरांना दोनशे ते अडीचशे रुपये देऊन त्यांची बोळवण केली जात आहे.

राज्यात बालकामगार विरोधात कठोर कायदे अस्तित्वात असून देखील या कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे, शेतकऱ्यांचा कापूस काटा करतांना जास्त भाव सांगून अर्धा कापूस खाली झाला की भाव कमी केला जात असल्याचा आरोप जिवती तालुक्यातील राहपल्ली येथील शेतकरी वैजनाथ घुले यांनी केला आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे तर दुसरीकडे जिनिंग मध्ये बालमजूरांकडून कमी मजुरी देऊन काम करुन घेतले जात आहे. काही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सदर बाबीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये