अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई
कोकेवाडा धानोली रोड व चपराळा गावाजवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
एका हप्त्यात चार ट्रॅक्टर कारवाई : तहसीलदार राजेश भांडारकर ॲक्शन मोडवर
अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने कारवाई करीत ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई केली. सदर घटना दिनांक 8 रोज शनिवारला रात्रो 12:30 वाजता च्या सुमारास तालुक्यातील कोकेवाडा धानोली शेत शिवारारस्त्यावर गावाजवळ घडली.
सदर ट्रॅक्टर क्र, एम एच 29 टी सी 4175 धानोली कोकेवाडा घाटावरून अवैध रेती रेती भरून येत असल्याची गोपनीय माहिती गौण खनिज पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी कोकेवाडा गावाजवळ असल्याने सदर ट्रॅक्टर शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने जमा करण्यात आले. सदर ट्रॅक्टर आशिष ज्ञानेश्वर खाडे रा. धानोली येथील यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले.
सदर ट्रॅक्टर शेगाव पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले असून पुढील कारवाई महसूल विभाग करीत आहे. सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज पथक तलाठी गोविंदा सेलोटे, तलाठी खुशाल मस्के, मंडळ अधिकारी अनिल दडमल, निर्दोष फुलबागे, नितीन बुचुंडे कोतवाल यांनी केली.
दुसऱ्या कारवाई दिनांक 8 मार्च 2025 रोजी सकाळी साडेसात वाजता भद्रावती तालुक्यातील चपराळा नाल्यातून शेतशिवारा जवळ अवैद्य रेती भरून येत असलेल्या ट्रॅक्टरची गोपनीय माहिती मिळाली असता कारवाई करण्यात आली. सदर ट्रॅक्टर देविदास गोसावी पाझारे रा. सुमठाणा यांच्या मालकीची असून ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 ए पी 50 25 असून सदर ट्रॅक्टर भद्रावती तहसील कार्यालय येथे लावण्यात आले. ही कारवाई राजेशभांडारकर यांचे नेतृत्वात तलाठी विनोद चिकटे तलाठी अनिल गहूकर तलाठी गिरीश कोहळे कोतवाल संदीप रामटेके प्रकाश दुपारे व तलाठी अनिल मस्के यांनी केली.