ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि.प.प्राथमिक शाळा खंठाळा येथे जागतिक महिला दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

येथून जवळच असलेल्या खंडाळा या गावातील जि.प.प्राथमिक शाळेत 8 मार्चला ” जागतिक महिला दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी लिडर मातांचा सन्मान करण्यात आला. तसेच निपुण शपथ घेण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक सुधीर अलोने, अंगणवाडी कर्यकर्ती वर्षा मेश्राम यांनी मार्गदर्शन केले.संचालन व आभार अनिल नाट शिक्षक यांनी केले.

  यावेळी अंगणवाडी कार्यकर्ती येनुरकर, बनकर ताईंची उपस्थिती होती. तसेच शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्य सिमा राखडे,शिक्षणप्रेमी पवन डेंगे, तुषार कांबळे व माता पालक उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये