ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायबर गुन्ह्याबाबत एन.सी.सी. कॅडेड यांना मार्गदर्शन

२१ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालीयन, वर्धा येथे सायबर जनजागृतींतर्गत आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक २४.०६.२०२३ रोजी बि.डी. इंजीनिअरींग कॉलेज, होस्टेल येथे एन.सी.सी. चा कॅम्प सुरु असल्याने २१ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालीयन, वर्धा तर्फे एन.सी.सी. कॅडेड यांना सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबीरामध्ये सायबर शाखेतील श्री. निलेश कट्टोजवार, श्री. कुलदिप टांकसाळे, श्रीमती मिना कौरती व श्रीमती स्मिता महाजन यांनी फेसबूक, व्हॉट्सअप व इतर सोशल मिडीयाचे गैरवापर रोखण्याकरीता व सायबर ग स्वत:ला सुरक्षीत ठेवण्याच्या उपायांची माहिती दिली तसेच ऑनलाईन बँकींग व्यवहारातील फसवणुकीपासून स्वत:चा बचाव करुन इतर लोकांना सुध्दा सतर्क करण्याबाबत सांगण्यात आले. गुन्हा होण्यापूर्वी त्यावर प्रतिबंध व जनजागृती हाच नुकसानापासून वाचण्याचा सर्वात चांगला उपाय आहे

सदर कार्यक्रमास २१ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालीयन, वर्धा येथील अधिकारी कर्नल श्री. शमीक घोष, ले. कर्नल श्री. मुर्गेशन सी., सुभेदार श्री. रविंदर सिंग, नायब सुभेदार श्री. पिंटोरी व २५२ एन.सी.सी. कॅडेड उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये