ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन, पुलगाव हद्दीतील कुख्यात गुंड व दारुविक्रेत्यावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन, पुलगाव हद्दीतील खडकपुरा, वार्ड क्रमांक ०६, नाचनगाव ता. देवळी जि. वर्धा परीसरातील कुख्यात गुंड कुणाल ऊर्फ महादेव ऊर्फ देवाभाई वासुदेव रोहणकर, वय २६ वर्ष, रा. खडकपुरा, वार्ड क्रमांक ०६, नाचनगाव ता. देवळी जि. वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन, पुलगाव अभिलेखावर सन २०२० पासून शरीरा विरुध्द, मालमत्ते विरुध्द तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत एकुण ०९ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये घातक शस्त्रासह बाळगणे, शस्त्र बाळगून गंभीर दुखापत करणे, चोरी करणे, विनयभंग करणे, दारुची बाहतुक करणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. आणि सतत गुन्हे करण्याच्या सवईचा गुन्हेगार होता. त्या पैकी संपूर्ण ०९ गुन्हें न्यायप्रविष्ठ आहेत. मागील ४ ते ५ वर्षापासून स्थानबध्द ईसम नामे कुणाल ऊर्फ महादेव ऊर्फ देवाभाई वासुदेव रोहणकर, वय २६ वर्ष, रा. खडकपुरा, वार्ड क्रमांक ०६, नाचनगाव ता. देवली जि. वर्धा याने पोलीस स्टेशन, पुलगाव व नाचनगाव परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवून सार्वजनिक जिवन विस्कळीत झाले होते. कुणाल ऊर्फ महादेव ऊर्फ देवाभाई वासुदेव रोहणकर, वय २६ वर्ष, रा. खडकपुरा, वार्ड क्रमांक ०६. नाचनगाव ता. देवळी जि. वर्धा याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन, पुलगाव अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत होत असल्याने त्याचे व त्याचे गुन्हेगारी गतिवोधी थांबत नसल्याने त्याचे विरुध्द सन २०२३ मध्ये कलम ११० फौजदारी प्रकीया संहोता, सन २०२४ मध्ये कलम १०६, ११६(३) फौजदारी प्रकीया संहोता अन्वये प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आल्या होत्या. परंतु अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसल्याचे व सतत गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आले.

त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, पुलगाव यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधौद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातवा कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानवध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा मा. वान्मथी सी. यांना केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिहाधिकारी, वर्धा यांनी दिनांक ०५ मार्च २०२५ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन त्यास नागपुर मध्यवती कारागृह, नागपुर येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. स्थानबध्द आदेशांन्वये त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.

आगामी येणारे सण उत्सव निर्भीड व शांततापूर्ण वातावरणात पार पडण्याचा उद्देशाने अशा अवैधरीत्या दारुविक्रेत्यांवर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्या करीता पुरवठा करण्याऱ्या दारुविक्रेत्यांवर तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तींवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मयी सी., तसेच मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. अनुराग जैन, यांनी दिलेले आहे.

सन २०२४ मध्ये आज पावेतो एकुण १९ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत जेल मध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे. तसेच सन २०२५ मध्ये अद्याप पावेतो ०५ अवैध दारुविक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींना जेल मध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.

मा. जिल्हाधिकारी, वर्धा मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे बेधडक मोहीमे मुळे अवैध दारू विक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती मध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.

सदरची कार्यवाही ही मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा, डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. राहुल चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा, पो.नि. विनोद चौधरी, स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शना खाली स.पो.नि. पंकज वाघोडे, स. फी. संजय खल्लारकर, पो.हवा. अमोल आत्राम, पो.हवा. आशिष महेशगौरी नेमणुक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा, पो.नि. राहुल सोनवणे, पोलीस अंमलदार राजेंद्र हाडके, विनोद रघाटाटे, रितेश गुजर, शेखर चुटे पोलीस स्टेशन, पुलगाव यांनी केली आहे-

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये