ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवळी पोलिस स्टेशन अंतर्गत रेती घाटावर रेड

एकूण 14 लाख 8 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 03 मार्च 2025 रोजी पोलिस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण पुलगाव यांच्या पथकाने देवळी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेती घाटावर अवैध प्रकारे वाळू चोरी करणाऱ्यांना वाहतूकदारांना ट्रक चालक व मालक यांच्या ताब्यातून सहा ट्रॅक्टर व ट्राॅलीसह 14,8,000/- रुपयांचा ट्रक सह रेतीचा मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे व आरोपी नामे (1) ट्रॅक्टर चालक नामे आकाश गजानन राऊत राहणार वार्ड नंबर 03 सोनेगाव बाई तालुका देवळी जिल्हा वर्धा आरोपी नामे (2 ) ट्रॅक्टर मालक नामे गजानन कोल्हे राहणार तह. जिल्हा वर्धा पसार आरोपी नंबर (3) ट्रॅक्टर चालक नामे रोशन गुडभेले राहणार पिंपरी मेघे तह जिल्हा वर्धा पसार यांच्या पासून एक स्वराज कंपनीचा 744 ट्रॅक्टर क्रमांक एम एच 32- पी -4288 किंमत 5,00000/- रुपये ज्यांची ट्राॅली क्रमांक एम एच 32- ऐ एस- 8568 ज्यांची ट्राॅलीसह किंमत 7,00000/- रुपये (2)आयसर कंपनी माॅडेल नंबर 485 ट्रॅक्टर क्रमांक एम एच 32- पी -3702 किंमत 5,00000/- रुपये ज्यांची ट्राॅली लाल रंगाची जिचा क्रमांक एम एच 32- पी- 2097 किंमत 2,00000/- रुपये ज्यांची ट्राॅलीसह किंमत 7,00000/- रुपये.(3) दोन ट्रॉली मध्ये अंदाजे एक ब्रास 35 ते 40 घमेले रेती किंमत 8,000/- रुपये असा जुमला किंमत 14,08,000/-रुपये आरोपी वर पोलिस स्टेशन देवळी येथे अपराध क्रमांक 160/2025 कलम 303(2) 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 सहकलम 3(1)130,177,181 मोवाका 48(8) महाराष्ट्र महसूल कायदा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण आणि यांच्या पथकाने केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये