नदीच्या पात्रातून रेती (गौण खनिज) ची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक-मालकवर कारवाई
एकूण 7 लाख 5 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सविस्तर असे की, आजरोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने पो.स्टे. तळेगाव हद्दीत मुखबीरचे खबरेवरून नाकाबंदी केली असता यातील आरोपी चालक हा मालकाचे संगणमताने बाकली नदीच्या पात्रातून विना पास परवाना रेती चोरून रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातील 1) एक हिरव्या रंगाचा जॉन डीयर कंपनीचा MH 32 P 4078 क्रमांकाचा ट्रॅक्टर, कि. 6,00,000 रू 2) ट्रॅक्टरला लागुन असलेली एक केसरी रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली कि. 1,00,000 रू. 3) ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये अंदाजे 1 ब्रास रेती किं 5,000 रू असा एकूण एकूण जु.किं. 7,05,000 रू चा मुद्देमाल जप्त करून,1) मोहन रामभाऊ वरठी, वय 26वर्ष, रा. तळेगाव, तह. आष्टी जि वर्धा (चालक) 2) मालक – फिनसिंग टाक, रा. तळेगाव, तह. आष्टी, जि. वर्धा, (पसार) आरोपीतांविरूध्द पो.स्टे. तळेगाव येथे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
कारवाई पथक मा. पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पो.नि.विनोद चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, पो.अं. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.