गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुकान फोडी, मोटार पंप चोरी, बॅटरी चोरी करणारे आरोपी यांना अटक

१ लाख ५ हजारावर माल जप्त करुन ४ गुन्हे उघड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       थोडक्यात हकीकत स्थानिक गुन्हे शाखा वर्धा कडून पो स्टे सावंगी व वर्धा शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 1) गोविंद सिंग बबलुसिंग भादा वय 21 वर्ष (अटक) 2) विधी संघर्ष बालक 02  यांना ताब्यात घेऊन गुन्हा संमधाने विचारपूस केली असता त्यांनी पो स्टे वर्धा व सावंगी परिसरातील अश्या एकूण 04 गुन्हे केल्याचे कबुल केल्याने त्यांचे कडून वरील प्रमाणे एकुण जु.कि 1,05.400 /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांचे कडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस करण्यात आले. 1) वर्धा(शहर) अप क्र. 1003 /2023 कलम 457,380 भा.द.वि
2) पोस्टे सावंगी(मेघे) अप क्र 467 /2023 कलम 379 भा.द.वि 3) अप क्र 669/2023 कलम:- 379 भा.द.वि 4) अप क्र460 /2023 कलम 379 भा.द वी
करिता सदरचा अहवाल माहितीस्तव सविनय सादर आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड सा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे स. फौ. संतोष दरगुडे, गजानन लामसे, राजेश तीवस्कर, विकास अवचट, राकेश आष्टणकर, रितेश शर्मा, संघशन कांबळे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये