ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व. विलासराव देशमुख यांच्या बद्दल अपशब्द बोलणाऱ्या भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा काँग्रेस पक्षाने केला निषेध 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  देऊळगाव राजा तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातुर येथे कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांचे बद्धल अपमानास्पद विधान केल्याने त्यांचा आज बुधवारी दुपारी देऊळगाव राजा बस स्टँड चौकामध्ये जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

स्व विलासराव देशमुख अमर रहे, रविंद्र चव्हाण मुर्दाबाद, भाजप सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देण्यात आल्या.

 त्यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते रमेश दादा कायंदे, राका शरद पवार पक्षाचे नेते गंगाधर भाऊ जाधव, गणेश सवडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास भाऊ डोईफोडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अतिश कासारे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अभिनव खांडेभराड, विष्णु भाऊ रामाने, हरीभाऊ शेटे, प्रकाश राजे, विश्वास झिने,अयुब भाई, मुबारक खान,रवि इंगळे, प्रा. अशोक डोईफोडे,इरफान सैय्यद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये