ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जादुटोना करून लोकांच्या आजार पणाचा उपचार करून फसवणुक करणाऱ्या टोळीला पोलीस स्टेशन वर्धा शहर पोलीसांची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. १७/०२/२०२५ रोजी फिर्यादी नामे प्रकाश पुंडलीकराव शिंदे, वय ६५ वर्ष, रा. सुदामपुरी, डॉक्टर अग्रवाल यांचे हॉस्पीटल मागे वर्षा हे सकाळी १०:०० वा. च्या सुमारास त्यांच्या घरासमोर कुटुंबासोबत बसुन असतांना त्यांना पाहुन एक अनोखळी पुरुष व दोन महिला असे तिघे एका विना नंबर प्लेट ग्या हिरो होन्डा कंपनीच्या पेंशन मोटार सायकल ने त्यांचे घराजवळ आले होते. त्यांनी फिर्यादी यांना आमच्याकडे चमत्कारीक शक्ती असून तुमच्या पायाचा आजार चमत्कारी शक्तीने बरा करून देतो असे सांगुण फिर्यादी यांच्या घरात प्रवेश केला. सदर अनोळखी ईसम यांनी चमत्कारी कृती करून तोंडातुन रक्तासारखे पाणी कागदावर कागुण फिर्यादी कडुन ५,०००/- रू. घेतले. त्यादरम्यान आरोपींनी फिर्यादी यांना त्यांचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखविले तेव्हा त्यांच्याकडे प्रत्येकाचे ३ वेगवेगळे आधार कार्ड दिसुन आल्याने फिर्यादी यांना त्यांच्यावर संशय आला. यातील फिर्यादी यांना अशाच प्रकारच्या ईसमाने जादुटोना व चमत्कारी शक्तींनी तुमच्या पायाचा आजार बरा करतो माणुन फसवणुक केली होती त्यावेळी फिर्यादी यांनी व्हिडीओ सुध्दा बनविला होता. त्यामुळे फिर्यादी यांनी वरील अनोळखी इसमांना सदरचा व्हिडीओ दाखविला तेव्हा तिन्ही आरोपी घाबरले त्यावर फिर्यादी यांनी तुमची पोलीस स्टेशन येथे तक्रार करतो असे सांगीतल्याने आरोपी यांनी सांगीतले की, तुमनी फसवणुक करणारा हमारा आदमी है। हम उसके पैसे आपको वापस करते पुलीस में कम्पलेट मत करो असे म्हणून त्यांना रोख ५०,०००/- रू. परत दिले.

त्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस हेल्पलाईन क्र. ११२ या क्रमांकारवर फोन करून पोलीसांना सदर घटनेबाबत माहिती दिल्याने पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचुन आरोपी नामे १) सलालउ‌द्दीन अब्दुल हफीज, वय ६५ वर्ष २) अजीजन सल्लाउ‌द्दीन हफीज खान, वय ५८ वर्ष, (महीला) ३) सायरा बानो शरीफ मोहम्मद, वय ३४ वर्ष, (महीला) सर्व रा.सुंदी रा. रेगत मोहल्ला बुंदी (राजस्थान) यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे आणुन फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अप. क्र. २४३/२०२५ कलम कलम ३१८(४), ३३७, ३३९, ३४०(२), ३(५) सहकलम ३(२) महा. नरबळी व ईतर अमानुश अनिष्ठ प्रथा जादुटोणा प्रति. कायदा सहकलम ३३(२) महा. वैदयकीय व्यवसायी अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्‌ह्याच्या तपासा दरम्यान आरोपीतांकडून १) एका बिना नंबर प्लेट ची हिरो होन्डा कंपनीच्या पेंशन मोटार सायकल, अ. कि. ३०,०००/- २) ०२ लोखंडी ताबीज, ३) ०३ पास्टिक पन्नी ला सुत गुंडाळलेले ताबीज, आरोपी सल्लाउ‌द्दीन हफीज यांचे जन्म तारीख ०१/०१/१९७९ असलेले आधार कार्ड आधार नंबर ३१०३६६६९१९५७ असे असलेले, ४) आरोपी सल्लाउ‌द्दीन हफीज यांचे जन्म तारीख ०१/०१/१९५७ असलेले आधार कार्ड, आधार नंबर ३१०३६६६९१९५७ असे असलेले, ५) आरोपी सल्लाउ‌द्दीन हफीज यांचे इंडीयन युनियन डाकींग लायसन्स १ ०८ २०२४०००४८१३ नंबर असलेले, ६) आरोपी अजीजन यांचे जन्म तारीख ०१/०१/१९६४ असलेले आधार कार्ड, ७) आधार नंबर ९४११२५०३९९४१ असे असलेले, ८) आरोपी अजीजन यांचे जन्म तारीख १९७१ असलेले आधार कार्ड, आधार नंबर ९४११२५०३९९४१ असे असलेले, ९) आरोपी अजीजन यांचे जन्म तारीख ०१/०१/१९६६ असलेले जन आधार कार्ड, १०) परीवार पहगान संख्या ५०२२०६७५१४ असे असलेले, ११) आरोपो सायरा बानो यांचे जन्म तारीख १०/०७/१९८५ असलेले आधार कार्ड, १२) आधार नंबर ८६३२४९३८७६२५ असे असलेले, १३) ईकबाल यांचे जन्म तारीख ०१/०१/१९९२ असलेले आधार कार्ड, १४) आधार नंबर ६१८३८६४७१४९२ असे असलेले, १५) बैंक ऑफ कोरीया १००० WON नोट, १६) विस्मल्लाह हिर्रहमा निर्रहीम असे लिहलेले असलेले ०२ कार्ड, १७) ऊर्दू भाषेत लिहलेले असलेल्या ०३ चिट्टया १८) शरीरावर रोग असलेले व त्यावर उपचार करीत असणारे बार्ट ०२. १९) TURPENTINE OIL ची ४०० उस ची बॉटल, २०) Beverll minerals चे ५०० ml ये बॉटल मध्ये तेल, २१) ०४ पांढऱ्या रंगाचे लहान प्लास्टिक डबीत तेल, २२) ०२ पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक डबीत पावडर, २३) Dabur Arogyavardhini Gutika चे डब्बी मध्ये चिक्क्ट द्रव, २४) FAIZ JOINT RELIFE GOLD चे डब्बी मध्ये पिवळया रंगाच्या १० गोळया, २५) एका लहान प्लास्टिकचे बॉटल मध्ये विटकरी रंगाचे पाऊडर, २६) एका लहान प्लास्टिक बॉटल मध्ये पांढऱ्या रंगाचे पाऊडर, २७) FAIZ JOINT RELIFE OIL ची ५० उस ग्या ०२ बॉटल, २८) Surkh ची १०० उस ची बॉटल, २९) एक जर्मनचा चापट डब्बा त्यामध्ये, चार पिवळया धातुच्या पुंगळ्या, एक लाल रंगाची प्लास्टिकची पुंगळी, एक स्टिलची धारधार वस्तु, एका स्टिलचे लहान डब्बी मध्ये काळया रंगाच्या विय्या, एका कागदयाचे पुडी ०४ काळया रंगाच्या बिया, कॉटन, ३०) एका लाल सोनेरी रंगाचे पिशवी मध्ये पांढऱ्या रंगाच्या ३७ गोळया, ३१) एक कच्च्या रंगाची लेदरची बंग जुनी वापरती अं. कि. ५००/- ३२) एक पांढऱ्या रंगाचा LAVA A3 कंपनीचा कि पेंड मोबाईल ज्याचा IMEI NO. १. ३५९५३५६२७८८९८३७, IMEI NO. २. ३५९५३५६२७८८९८४५ असा असून मोबाईल सिम नंबर ९९२८३३५१३३ असा असून जुना वापरता अं.कि. ५००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच फिर्यादी यांचेकडुन त्यांना आरोपीने दिलेले ५०,०००/- रू जप्त करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयांतील आरोपीचा हे सध्या पोलीस कोठडीत आहे. गुन्हयांचा तपास सुरू आहे.

सदर कारवाई मा. श्री अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्षा मा. डॉ. श्री सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री पराग पोटे, पोउपनि श्री शैलेश जगताप, परि. पोउपनि श्री शैलेश जगताप, पो हवा. प्रशांत बावनकर, लोभेश गाडवे, पंकज भरणे, पो.शि. समिर खोब्रागडे, दयानंद धोंगडे सर्व नेमणुक पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये