ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयात शिवजयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक डॉ. शेखर प्यारमवार,प्रवीण काटपल्लीवार,प्रकाश गेडाम,धनंजय गुरनुले,भुजंग आभारे,प्रथमेश वारजूरकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन राहुल आदे यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक महेश देहारकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रामचंद्र खिरटकर,सुरेंद्र डोहने,अरविंद केळझरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये