ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकांच्या पदावर डी.एड./बी.एड. धारक बेरोजगार तरुणांची नियुक्ती करा

महेश देवकते यांची थेट शालेय शिक्षण मंञ्याकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- राज्यातील रिक्त असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंञाटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती न करता राज्यातील बेरोजगार डी.एड/बी.एड धारक तरुणांची नियुक्ती करावी, अशी मागणी महेश देवकते, माजी उपसभापती पं.स.जिवती तथा भाजयुमो चंद्रपूर जिल्हा यांनी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंञी दिपक केसरकर यांचेकडे प्रत्यक्ष भेटून, निवेदनद्वारे मागणी केलेली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी ७ जुलै २०२३ रोजी काढलेले परिपञक/निर्णय हे संयुक्तिक नसून, त्या निर्णयाने राज्यातील डी.एड/बी.एड उत्तीर्ण बेरोजगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

बेरोजगार डी.एड/बी.एड धारकांना जि.प.शाळेच्या प्राथमिक शिक्षक पदांवर थेट नियुक्ती केल्यास; राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल व त्यांचे उदरनिर्वाहच्या समस्येचे निरसन होऊन, विधार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल.

राज्यात लाखो डी.एड/बी.एड व अन्य पदविधर बेरोजगार तरुण-तरुणी आहेत. अशा परिस्थितीत त्या तरुण-तरुणींचा सहानुभूती आणि एक सामाजिक बांधिलकीतून विचार करुन, त्या रिक्त पदावर सेवा निवृत्त शिक्षकांची २०,००० मानधनावर नियुक्ती न करता बेरोजगार डी.एड/बी.एड धारकांची नियुक्ती करावी, अशी मागणी शालेय शिक्षण मंञ्याकडे केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये