घरफोडी, दुकानफोडी व मंदीर चोरीचे एकुण १० गुन्हे उघडकिस
एकुण १५ लाख ८८ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हयामध्ये व वर्धा जिल्ह्यात लगत असलेल्या जिल्हयांमध्ये वाढत असलेल्या परफोडी, दुकानफोडी तसेच चोरीच्या गुन्हयाच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या मुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, वर्षाचे दोन पथक दिनांक १६/०२/२०२५ रोजी वर्षा शहर परिसरात वारंवार होत असलेल्या योरी, घरफोडी व दुकान चोरी मधील अज्ञात आरोपी व मुद्देमालाचा शोध संबंधाने सराईत गुन्हेगार चेक व पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपी क. १) सुनिल उर्फ रॉकी शांताराम शिंदे, वय २३ वर्षे, रा. गिट्टीखदान बोरगांव मेघे, वर्धा २) चंदु उर्फ चंद्रकांत हिरा बतकल, वय ३६ वर्षे, रा. पंकज टॉकीज चे मागे हनुमान वार्ड, शंकर मंदीर जवळ वरोरा, ता. वरोरा जि. चंद्रपुर, ह.मु. गिट्टीखदान बोरगांव मेघे, वर्षा यांना ताब्यात घेवुन चोरीचे गुन्हयासंबंधाने सखोल विचारपुस केली असता आरोपीतांनी मागिल काही दिवसात त्यांचे कडील काळया रंगाची चारचाकी वाहनाया वापर करून त्यांचे ईतर साथिदारांच्या मदतीने वर्धा जिल्हयातील १) पो.स्टे. सेवाग्राम हद्दीतील ०१ घरफोडी व २१ किराणा दुकाण २) पौ.स्टे. खरांगणा हद्दीतील आंजी मोठी येथील किराणा दुकान फोडुन चोरी ३) पो. स्टे. देवळी येथील गौळ गावातील खराबे महाराज देवस्थानातील बोरी, ४) पो.स्टे. पुलगांव येथील घरफोडी, ५) पो.स्टे. हिंगणघाट हद्दीत ०१ किराणा दुकान व ०१ घरफोडी चोरी ६) हिंगणघाट येथील रेल्वे हद्दीतील वॅगन फोडुन तांबा चोरी तसेच यवतमाळ जिल्यातील १) पो.स्टे. वणी येथील परफोडी, २) पो.स्टे. राळेगांव येथील दुकाना फोडुन तांबा चोरी अश्या वेगवेगळे ठिकाणी परफोडी, दुकान फोडी व मंदिर चोरीचे एकूण १० गुन्हे केल्याची कबुली दिली.
सदर गुन्हयातील चोरलेल्या मुद्देमाला संबंधाने आरोपीतांना कसुन विचारपुस केली असता त्यांनी उपरोक्त गुन्हयातील पिवळ्या धातुचे मंगळसूत्र, बांगडया, कानातील विऱ्या, गळयातील चेन, अंगठी असे पिवळया धातूचे १४६ ग्राम वजनाचे दागीने, सांदिये शिक्के, पैजण ६८ ग्राम वजनाचे दागीने, पांढऱ्या मण्यांची माळ, नगदी ३.९८,०००/- रुपये, ०१६ पेन ड्राईव्ह, विविध कम्पनीचे ३५ सिगारेट पाकिट, बिडी बंडल, तेलाचे कॅन, तुपाचे डब्बे तसेच आरोपीलांचे २ मोबाईल फोन, घरफोडी करण्या करिता वापरण्यात आलेले पेचकस असा एकूण जु.किं. १५,८८,३९१/- रू चा मुद्देमाल आरोपीतांनी काढून दिल्याने सदरचा माल गुन्हयाचे पुराव्याकामी आरोपीतांकडून जप्त केला असुन सदर आरोपीतांकडुन अशाच प्रकारचे ईतरही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, वांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो. हवा. गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, रितेश शर्मा, मनिष कांबळे, अक्षय राऊत, म.पो.हया. अलका कुबलवार, पो. अंमलदार अमोल नगराळे, मंगेश आदे, दिपक साठे, प्रफुल पुनवटकर, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.