ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेला व शालेय विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपुर) : आज, २६ जानेवारी २०२५, रविवार, प्रजासत्ताक दिनानिमित्त संत श्री साईबाबा बहुउद्देशीय मंडळ, घुग्घुसच्या वतीने नगरपरिषद जवळ जनतेला व शालेय विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी “स्वातंत्र्य दिन चिरायू”, “वीर शहीदों की जय”, “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” यांसारख्या घोषणांनी परिसर गजबजून गेला आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमाद्वारे देशाच्या स्वाभिमानाचा गौरव करण्यात आला आणि वीर शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमास संत श्री साईबाबा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष गणेश शेंडे, उपाध्यक्ष पंकज बावणे, सचिव लक्ष्मण बोबडे, तसेच गणेश वझे, मोहन शेंडे, हीताशू शेंडे व इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये