ब्रह्मपुरी केमीस्टच्या वतीने रक्तदान शिबीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यातील सर्व केमीस्टच्या बंधू व भगिनींच्या वतीने केमीस्टचे हृदय सम्राट मा. श्री. जगन्नाथजी शिंदे साहेब अध्यक्ष AIOCD, MSCDA यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण भारतामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने ब्रह्मपुरी शहरात भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. हे शिबीर डॉ. हेडगेवार रक्त पेढी नागपूर यांच्या चमूच्या मदतीने ब्रह्मपुरी व नागभीड केमीस्ट असोसिएशन वतीने IMA HALL ब्रह्मपुरी येथे घेण्यात आले.
या शिबीरात मोठ्या प्रमाणात केमीस्ट बंधु व भगिनी या व्यतिरिक्त समाजातील ईतर रक्तदात्यांनी सहभाग घेतला. एकुण ४९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराला विशेष सहकार्य तालुक्यातील महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी बेटाळा महाविद्यालयाचे लाभले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी कमिस्टचे ऋषीकेश गोखरे,सुरेश आतवार,विजय बोरकर, लोकेश शेंन्डे, ब्रिजमोहन राठी, रणजित फटिंग, रितेश डोरले, शरद मदनकर,कुंदन चापले, मनोज भुपाल यांनी अथक परिश्रम घेतले.