ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

योगविद्या आत्मसात करुन सर्वांनी निरोगी व दिर्घायुषी जीवन जगावे – हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट

प्राचिन भारतातील ऋषीमुनींद्वारे योगविद्येचा उगम झाला असून आज ही विद्या वैश्विक स्तरावर पोहचविण्याचे महान कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या विशेष पुढाकारातून झाल्याने आज बहुतांश देशांमध्ये योग दिवस साजरा होत आहे हा देशाचा फार मोठा सन्मान आहे. निरोगी व प्रदिर्घ आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकांनी योगविद्येचा ध्यास घेवुन ही कला शिकण्याचा प्रयत्न करुन योगाचा दैनंदिन जिवनात समावेश केल्यास देशाला निरोगी, सुदृढ व कर्तबगार पिढी लाभेल, पर्यायाने बलशाली राष्ट्र उभारणीला बळ मिळेल असे विचार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जागतिक योग दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास संबोधित करतांना व्यक्त केले.

स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कुल वरोरा नाका, मैदानावर दि. 21 जून रोजी चंद्रपूर महानगर जिल्हा भाजपा व पतंजली योग परिवार चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या योग शिबीरात भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. किरण देशपांडे, पतंजलीचे राजकुमार पाठक, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टुवार, पतंजलीच्या स्मिताताई रेभनकर, नसरिन शेख, अपर्णाताई चिडे, स्मिताताई श्रीगडीवार, कल्पनाताई कोयालवार, लताताई चाफले, राव ताई, अंजूषाताई दलाल, वैशालीताई रामेडवार, प्रतिभाताई रोकडे, विनोद शेरकी, सचिन कोतपल्लीवार, मधूकर राऊत, छबुताई वैरागडे, वंदनाताई संतोषवार, किरणताई बुटले, मायाताई उईके, ॲड. सारिकाताई संदूरकर, पूनम तिवारी, गौतम यादव यांचेसह अनेकांची उपस्थिती लाभली.

आपल्या मार्गदर्शनात अहीर यांनी सांगीतले की, प्रधानमंत्री मोदीजींनी जागतिक योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव 11 डिसेंबर 2014 मध्ये मांडला होता. या प्रस्तावास संयुक्त राष्ट्रातील 177 सदस्य देशांनी मंजूरी दिली व पूर्ण बहुमताने हा प्रस्ताव पारित करण्यात आला होता हा भारताचा बहुमान आहे. मोदीजींच्या वैश्विक नेतृत्वाचा प्रभाव आहे. आजच्या या योगदिवसाच्या पर्वावर प्रत्येकांनी निर्धार करुन योगाला दैनंदिन जिवनाचा अविभाज्य घटक बनवावे व प्रत्येक व्यक्तीला योग विद्येचे वैज्ञानिक महत्व सांगून त्यांना याकरिता प्रवृत्त करावे असे आवाहन केले.

आज योगविद्येकडे सर्व क्षेत्रातील लोक ज्यात वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सुध्दा सहभाग वाढला आहे या चिरंतन ठरलेल्या विद्येची आवड आपल्या मुलाबाळांमध्ये निर्माण करुन त्यांनाही योगविद्येकडे वळविण्याचे कार्य प्रत्येकांनी केले पाहिजे असे आवाहन अहीर यांनी केले.

या योगदिन कार्यक्रमात अन्य मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. तत्पूर्वी हंसराज अहीर व अन्य उपस्थित मान्यवरांनी योग प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. या प्रसंगी पतंजली योग परिवारातील प्रशिक्षक व अन्य मान्यवरांचा हंसराज अहीर व अतिथींच्या शुभहस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये