ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भेंडवी ग्राम पंचायतला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शंभर दिवसांच्या विकास कृती आराखड्याबाबत जनतेची सर्वसामान्य कामे त्वरित व्हावी या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी 29 जानेवारीला ग्रामपंचायत भेंडवी व शाळेला भेट देऊन पाहणी केली.

आपल्या भेटी अंतर्गत ग्रामपंचायतने तयार केलेल्या ऑक्सिजन पार्क व त्यामधील ऑर्गानिक भाजीपाला तसेच ग्राम वाचनालय ,बीज केंद्र ,शाळा व ग्रामपंचायत ची पाहणी केली .

याप्रसंगी संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे व ग्रामसेवक आशिष चत्रेश्वर यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विविध कामाची माहिती दिली

भेटीदरम्यान माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले .

 याप्रसंगी ग्रामपंचायत ने आलेल्या अधिकाऱ्यांना ऑरगॅनिक भाजीपाला भेट दिला व सर्वांसाठी झुणका भाकर व ठेच्याची व्यवस्था करण्यात आलेली होती.

सदर भेटीदरम्यान माननीय संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे तहसीलदार माननीय गौंड, गटशिक्षणाधिकारी श्री मनोज गौरकार, केंद्रप्रमुख श्री संजय त्रिपतीवार व इतर अधिकारी तसेच श्री रमेश मडावी सरपंच,श्री संतोष सलाम पोलीस पाटील,पेसा अध्यक्ष श्री कोरवते, ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष श्री विठ्ठल मडावी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री शेकू मेश्राम, श्री अंकुश सलाम व सुनील आत्राम ग्रामपंचायत सदस्य, सुनिता संतोष गेडाम अध्यक्ष,महिला बचत गट संघ, मनीषा विठ्ठल मडावी कृषी सखी ,चिन्नुबाई मंडीका, पार्वताबाई भिमराव उईके इत्यादी व्यक्ती व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये