वर्धा जिल्हाचे पालकमंत्री ना. डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते निरंजन वरभे यांना पुरस्कार प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झालेले असून या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस स्टेशन सेलू येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निरंजन वरभे यांना महाराष्ट्र पोलिस दलातील सेवेला 32 वर्षे पूर्ण झालेले असून आता पर्यंतच्या सेवा काळात 234 रिवार्ड व 25 प्रशस्तीपत्रे प्राप्त झालेले आहेत. माझ्या प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कडील प्राप्त प्रशस्तीपत्र आज रोजी २६ जानेवारीला जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे झेंडावंदन कार्यक्रम दरम्यान मा.श्री पंकजजी भोयर, गृह राज्यमंत्री ( ग्रामीण ) तथा पालकमंत्री, वर्धा जिल्हा यांचे हस्ते प्रदान करून मला सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला जिल्हाधिकारी वान्मथी सी मॅडम, . पोलीस अधीक्षक अनुराग जैन, वर्धा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.जितीन रहैमान वर्धा ,इतर मान्यवर मंडळी व अधिकारी उपस्थित होते.
या पुरस्कारा करीता मला माझे वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. त्या बद्दल मी सर्वांचा आभारी आहो.धन्यवा