Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

श्री बालाजी महाराजांची पुण्यनगरी देऊळगाव राजा शहर धुळ मुक्त करण्याचा मुख्याधिकारी मोकळ यांनी केला संकल्प

शहरातील सर्वच मार्गावरील धूळ ब्लोअर मशीन ने साफ करण्याच्या कामास सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीत न भूतो न भविष्यती अशी विकास कामांची गंगा वाहत असून शहरातील जास्तीत जास्त मार्गाचे मजबूतीकरण करण्यामध्ये मुख्याधिकारी अरुण मोकळ यांना यश आले असून शहरास अधिक सुंदर बनवण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून लोकसहभागाची हाक देत ठीक ठिकाणी चौकांचे सुशोभीकरण करण्याचा सपाटा लावण्यात आलेला आहे.

सर्व समावेशक शहराचा विकास ही कल्पना डोक्यात असल्याने मोकळ यांनी दूरदृष्टी ठेवत शासन दरबारी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करून शासनाकडून भरघोस विकास निधी प्राप्त करून घेतला आहे नुकतेच शासनाचे वतीने शंभर दिवस शासकीय उपक्रम राबविण्याचे आदेश देण्यात आलेले आहे त्या आदेशानुसार नपची इमारत मधील आतील भागास प्रत्येकाला बोध होईल अशा प्रकारचे भिंतीला रंगरंगोटी करण्यात येत आहे तर शहरातील सर्वच मार्गावरील धूळ साफ करण्यासाठी नव्याने ब्लोअर मशीन आणून रस्ते चकचकीत करण्याचे कामाला सुरुवात झालेली आहे श्रींची नगरी धुळमुक्त करण्याचा संकल्प अरूण मोकळ यांनी केला आहे.

नप प्रशासनाचे वतीने ज्या ज्या सोयी सुविधा नागरिकांना देणे बंधनकारक आहे त्या त्या सुविधा नागरिकांना पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न नप प्रशासनाचा असून नागरिकांनी सुद्धा वेळोवेळी नप प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सोलारचे पथदिवे बसविन्यात आलेले आहेत यामुळे शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडलेली आहे रमाई आवास योजनेमध्ये संपुर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये या नपाने बाजी मारली आहे तर रमाई आवास योजनेत ज्या ज्या लाभार्थ्यांनी नपा कडे रीतसर व परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेले आहे असे सर्वच प्रस्तावांना संबंधीत विभागाकडून मान्यता नपणे प्राप्त करून घेतली आहे व प्रत्यक्ष लाभ त्या त्या लाभार्थ्यास देण्यात आलेला आहे.

कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अरुण मोकळं यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये