
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- युगजेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था संचालित कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाशी संलग्नित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे तीन दिवसीय क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात सामाजिक कार्यकर्ते, व प्रेरणा महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे उपाध्यक्ष बालाजी पुरी यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक तुषार बावणे, संचालक रमेश राठोड, अरविंद मुसने, प्राचार्य नानेश्वर धोटे, प्रतीक मून ,तथा महाविद्यालयीन प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बालाजी पुरी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी, तसेच आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ महत्वाचे आहेत. स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंमध्ये सांघिक भावना निर्माण होते. खेळामुळे व्यक्तिमत्व विकास होतो. खेळात खिलाडूवृत्ती असली पाहिजे. खेळामुळे कृतीशीलता विकसित होऊन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता वाढीस लागते.
परंतु नवीन पिढी मोबाईलमध्ये गुंतलेली आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे असे मौलिक मार्गदर्शन केले तर तुषार बावणे यांनी प्रेरणा महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबवण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत.ग्रामीण भागातील विध्यार्थ्यानी पुस्तकी ज्ञानाबरोबरच विविध खेळाकडे सुद्धा महत्त्व देणे आवश्यक असून या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळत असते. प्रास्तविकात प्राचार्य नानेश्वर धोटे म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या गुणांची पारख होण्यासाठी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येतात. क्रीडा व कला मेळाव्याने विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक व बौद्धीक क्षमतेत वाढ होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. मनिषा मरसकोल्हे यांनी तर आभार कुंजम शेंडे हिने मानले. प्रेरणा कला व क्रीडा महोत्सवात प्रामुख्याने कबड्डी, खो-खो,क्रिकेट,हॉलीबॉल, लांब उडी,उंच उडी, धावणे या क्रीडा प्रकराबरोबरच एकपात्री, एकलनृत्य, समूहनृत्य,गीतगायन ,एकांकिका, नक्कल या कला प्रकाराचे सादरीकरण विद्यार्थी करणार आहेत.