Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पी. एम.महविद्यालय कोरपना येथे स्कूल कनेक्ट 2.0 ची कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डॉ. शैलेंद्र देव प्राचार्य महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर यांच्या मार्गदर्शनाcत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची राज्यातील अंमलबजावणी व विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण बदलाची माहिती करून देण्याकरिता इयत्ता नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी *स्कूल कनेक्ट 2.0 या अभियानांतर्गत महात्मा गांधी सायन्स कॉलेज व शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने पी.एम. महाविद्यालय कोरपणा येथे दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. विशाल मालेकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख पी.एम. महाविद्यालय, कोरपना हे असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. शरद बेलोरकर, शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर स्कूल कनेक्ट 2.0 चे समन्वय तालुका समन्वय प्रा. पवन चटारे प्रा. आर. टी .मेश्राम, प्रा. डॉ. देवाळकर हे उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक डॉ. बेलोरकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे काय? त्याची व्याप्ती, इयत्ता बारावी नंतर कोणकोणते अभ्यासक्रम आपण निवडावेत, त्या अभ्यासक्रमात कोणकोणत्या घटकाचा समावेश असेल, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थ्यांची भूमिका, अभ्यासक्रमाचे विषय, अभ्यासक्रमाचा कालावधी व विद्यार्थ्यांची जबाबदारी इत्यादीवर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी विचारलेले विविध प्रश्नांची उत्तरे मार्गदर्शकांनी दिली या कार्यशाळेला आर्ट्स कॉलेज कोरपणाचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चे समन्वयक डॉ. राजू मेश्राम तर आभार प्रदर्शन डॉ. देवाळकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये