वर्धा पोलीस दलांनी एका वर्षामध्ये 27 आंतरराष्ट्रीय व परप्रांतीय चोरट्यांच्या टोळ्यांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून 31 गुन्हे उघडकीस
अवैद्य व्यवसायामध्ये वाढ. 20 टक्क्यांनी वाढले दोष सिद्धिचे प्रमाण.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
हरविलेले 488 मोबाईल मालकांना परत केले.
अवैद्य व्यवसायामध्ये वाढ. 20 टक्क्यांनी वाढले दोष सिद्धिचे प्रमाण.
वर्षभरात 3 हजार 84गंभीर गुन्ह्यांची झाली नोंद.
वर्धा : जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक बसविण्याकरता पोलीस प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांसह इतर गुन्ह्यांमध्ये घट झाली. या वर्षभरात एकूण 3084 गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
गेल्या वर्षभरातील माहितीच्या अनुसार वर्ष 2023 मध्ये एकूण 3247 गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती. वर्ष 2024 मध्ये एकूण 384 गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असून वर्ष 2023 च्या तुलनेत 163 गुन्हे कमी झाले. जिल्ह्याचे अभिलेखावरील हत्या, हत्त्याचा प्रयत्न, डकिती, जबरी चोरी, घरपोडी, चोरी दुखापत, बलात्कार, विनयभंग व फसवणूक आदी गंभीर गुन्हात घट झाली. पोलिसांनी गोवंश वाहतुकीला व अवैध वाळतुकीलाही आळा घालण्याचा प्रयत्न चालविला आहे.
वर्षभरात जिल्ह्यात मोबाईल हरवल्याचे 820 तक्रारी सायबर सेल कडे प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी 488 मोबाईल ट्रेस करून मोबाईल मालकांना परत करण्यात आले. सोबतच सायबर क्राईम आणि पोलीस विभागाकडून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती व नवीन कायद्याच्या जनजागृती बद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात घेतलेल्या पत्र परिषदेत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी ही माहिती दिली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांचीही उपस्थिती होती.