Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

विविध सामाजिक संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जनसेवा सामाजिक समिती देऊळगाव राजा,देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना व सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा यांच्या वतीने देऊळगाव राजा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार 20 जानेवारी रोजी करण्यात आला.

याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री बळीराम मापारी,माजी अध्यक्ष श्री गोविंद अहिरे, अरुण सपाटे कोषाध्यक्ष, वयोवृद्ध श्री.पुर्णचंद्र जोशी, श्री.के.पी.खांडेभराड अध्यक्ष सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा व तिन्ही संस्थेचे सचिव गोविंद बोरकर, श्री . मधुकर धुळे, श्री . प्रकाश अहिरे, दिनकरराव जाधव, व्यंकटराव जमदडे,या पदाधिकाऱ्यांचे हस्तेपत्रकार बंधू व भगिनीचा सत्कार डायरी पेन रुमाल व पुष्पहार घालून करण्यात आला. याप्रसंगी प्रा. विनायकराव कुलकर्णी व देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे सचिव सुरज गुप्ता यांनी या संघटनांच्या कार्याचे कौतुक केले. देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघ, व्हॉईस ऑफ मिडिया, मातृतीर्थ पत्रकार संघ च्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री प्रकाश खांडेभराड यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये