भद्रावती येथे खैरे कुणबी समाजाचा तालुकास्तरीय स्नेह मिलन सोहळा
नवनिर्वाचित आमदार करण देवतळे तथा राज्यस्तरीय दर्पणकार पुरस्कार प्राप्त अतुल कोल्हे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट
खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ भद्रावती यांच्या वतीने स्थानिक मुरलीधर पाटील गुंडावार सभागृहात दिनांक 19 ला समाजाच्या तालुकास्तरीय कौटुंबिक स्नेह मिलन तथा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यात नवनिर्वाचित आमदार करण देवतळे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र तसेच पत्रकार राज्यस्तरीय दर्पणकार पुरस्कार विजेत्या पत्रकार अतुल कोल्हे यांचेसह अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य विठ्ठलराव मांडवकर तर प्रमुख अतिथी म्हणून मारोतराव सहस्त्रबुद्धे, विजय देवतळे, डॉक्टर आसावरी देवतळे, बंडू मांडवकर, साईनाथ वाकुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक नरेंद्र आरेकर व प्रलय मशाखेत्री यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी द्विप प्रज्वलन करून मारोतराव सहस्त्रबुद्ध यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित आमदार करण देवतळे, पत्रकार अतुल कोल्हे, मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी, रवींद्र चौधरी, दिनेश पाल आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सोहळ्यात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती बोरकुटे व राणी पाल यांनी केले. यावेळी अध्यक्ष हनुमान घोटेकर, सचिव आत्माराम देशमुख, कोषाध्यक्ष अश्विन हुलके, उपाध्यक्ष प्रशांत राऊत, सहसचिव निलेश बोरकुटे, कार्याध्यक्ष दशरथ सातपुते यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राजू तांगडे, योगेश शिवणकर, महेश वाघरे, ऋषिकेश कुडे, अमोल पांडे, विनोद पिपरे, बालाजी लडके, विलास घोटेकर, शंकर घोटेकर, राहुल चनकापुरे, लंकेश देशमुख, योगेश घोटेकर, नितीन नकाते, पांडुरंग भोयर, देवानंद ठाकरे आदींनी सहकार्य केले.