Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघच्या जिल्हा सहसचिव पदी गजानन तिडके तर जिल्हा कार्यकारणी केंद्रीय सदस्य पदी शिवाजी वाघ यांची निवड. 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारी कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली यामध्ये देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके यांची जिल्हा सहसचिव पदी तर ज्येष्ठ सदस्य शिवाजी वाघ यांची केंद्रीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की. मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारणी जिल्हा अध्यक्ष रणजीत सिंग राजपूत आणि जिल्हा सरचिटणीस कासिम शेख यांनी घोषित केली यामध्ये देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके यांची जिल्हा सह सचिव पदी निवड करण्यात आली तर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ सदस्य शिवाजी वाघ यांची जिल्हा कार्यकारणीत केंद्रीय सदस्य पदी निवड करण्यात आली.

गजानन तिडके यांनी यापूर्वी जिल्हा कार्यकारणी मध्ये सहसंघटक पदावर काम केलेले आहे. ते बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाशी संलग्नित असलेल्या देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांनी आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये पत्रकार संघाशी निगडित असलेल्या तसेच पत्रकार संघाच्या हिताची असलेले बहुसंख्य कामे केलेली आहे. तर शिवाजी वाघ तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष असून तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य सुद्धा आहेत. त्यांचे मार्गदर्शन नेहमी पत्रकार संघाच्या हिताचे असते, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये