Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

२६ जानेवारी ते २ फेब्रुवारी ला रोटरी उत्सव मेला भद्रावतीत आयोजित

गणराज्य दिनाच्या मुहूर्तावर आनंद मेळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         विविध सामाजिक उपक्रमासाठी प्रख्यात असलेल्या रोटरी क्लब भद्रावती तर्फे यावर्षी गणराज्य दिनाच्या मुहूर्तावर रोटरी उत्सव मेल्याचे आयोजन भद्रावतीत करण्यात आले आहे.

या मेळाव्यात विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे ऑडिशन स्वागत सेलिब्रेशन हाॅल मध्ये मागच्या महिन्यात घेण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा रोटरी उत्सव मेला तालुका क्रीडा संकुल भद्रावतीच्या भव्य प्रांगणात दिनांक २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान आयोजित केलेला आहे. आठ दिवस होणाऱ्या या रोटरी उत्सव मेल्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिक, प्रेक्षकांसाठी आयोजित केलेली आहे.

या रोटरी उत्सव मेल्यात विविध वयोगटात सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. त्यात फॅन्सी ड्रेस स्पर्धा, एकल न्यृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, एकल गीत गायन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केलेले असून प्रथम व द्वितीय क्रमांकाला प्रत्येक स्पर्धा व प्रत्येक गटासाठी आकर्षक असे बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत. रोटरी उत्सवाचा आकर्षक व प्रसिद्ध असा फटाका शो शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात आलेला आहे .२६ जाने. २०२५ तारखेला मान्यवर खासदार महोदय व आमदार महोदय, मान्यवर यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे.

सोबतच मनोरंजनासाठी विविध झुलांचा पार्क, खाण्याच्या विविध पदार्थांचे स्टाल तसेच विविध आकर्षक वस्तूंच्या दुकानांची रेलचेल या उत्सव मेल्यात राहणार आहे. तेव्हा भद्रावती परिसरातील समस्त नागरिकांनी या रोटरी उत्सव मेल्याचा आनंद घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष किशोर खंडाळकर, सचिव आत्माराम देशमुख, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर, सुधीर पारधी, डॉ माला प्रेमचंद, प्रवीण महाजन, सुनील पोटदुखे, हनुमान घोटेकर, अब्बास अजानी, डॉ ज्ञानेश हटवार, विक्रांत बिसेन, सुरेंद्र राउत, किशोर भोसकर, रूक्साना शेख मॅडम, विनोद कामडी तसेच समस्त रोटरी सदस्य भद्रावती यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये