Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

रासेयो शिबीर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र – प्राचार्य डॉ. चंद्रमौली यांचे प्रतिपादन

"रा.म.गांधी महाविद्यालयाचे कवठी येथे.रासेयो शिबीर"

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

    राष्ट्रीय सेवा.योजना च्या माध्यमातून महाविद्यालये विविध गावात शिबिराचे आयोजन करीत असतात,यात विद्यार्थ्यांना श्रम संस्कार, बौध्दिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातुन त्यांच्यात सांघिक भावना निर्माण करणे व अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यात येतो,म्हणजेच शिबिर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. चंद्रमौली यांनी केले,ते जि.प.उच्च प्राथ.शाळा कवठी येथे आयोजित रासेयो शिबिरात बोलत होते.

   राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय ,सावली चे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर तालुक्यातील जि.प..उच्च प्राथ.शाळा कवठी येथे आयोजित करण्यात आले,यावेळी मंचावर ,भारत शि.प्र.मंडळाचे उपाध्यक्ष अनिल स्वामी, डॉ विजय शेंडे, अड.कविता माहोरकर,नायब तहसिलदार अनमोल कांबळे,कवठी च्या सरपंच कांताबाई बोरकुटे, उपसरपंच राकेश घोटेकार,जि.प.प्राथ.शाळेचे मुख्याध्यापक नंदीग्रामवार,पोलीस पाटील, त.मु.स.अध्यक्ष,ग्रा.प.सदस्य आदी उपस्थित होते.

   सेवा योजनेच्या शिबिरात भाग घेऊन विद्यार्थ्यांना विकास होतो,आणि आपल्या ग्रामीण भागातील जनेतेचे राहणीमान आणि समस्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता येतात,असेही बोलताना डॉ .चंद्रमौली यांनी स्पष्ट केले.

  नायब तहसिलदार यांनी मार्गदर्शन करतांना शिक्षणातील योग्य दृष्टिकोण हा विद्यार्थांचे संपूर्ण व्यक्तिमत्व घडवू.शकते,विद्यार्थांनी नम्र पणे वागावे असा उपदेश केला.

   या शिबिरात जल संवर्धन, संविधान सम्मान,स्त्रीशक्तीकरण,मेन्टयुरल,हारजीत यावर.मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमा प्रसंगी उत्कृष्ट रासेयो स्वंयसेवक चक्षय कुमरे,उत्कृष्ठ स्वयंसेविका निशा कानपेल्लीवार,तर उत्कृष्ट समुह म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आदींना.गौरविण्यात आले.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.देविलाल वताखेरे,संचालन कु.रक्षा कोटगले,तर आभार डॉ .राजश्री मार्कंडीवार यांनी मानले.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि ग्रामवासीय जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये