Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ब्रम्हपूरी येथे सहीष्णु फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबीर

ऑस्ट्रेलियातील डाॅक्टरांची प्रमुख उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपूरी :- येथील सहिष्णु फाऊंडेशन द्वारा संचालित डॉ. वासुदेवराव भांडारकर धर्मार्थ दवाखाना येथे त्वचा व सौंदर्य उपचार आणि कृष्टरोग तपासणी शिबीर घेण्यात आले.

या शिबिरात मेलबर्न सिटी आस्ट्रेलिया मध्ये कार्यरत असलेले त्वचा कॅन्सररोग व सौंदर्य उपचार तज्ञ डॉ. अक्षय वाडेगावकर MBBS, FRACGP, FARGP, DCH यांचे कडून रुग्णांनी तपासणी व उपचार करून घेतले.

 शिबिरामध्ये 68 त्वचारोग त्रस्त रुग्णांनी सहभाग घेतला. या शिबिरात त्वचेचे विकार असलेल्या गरीब अणि गरजू रुग्णांना सहिष्णु फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय तज्ञ् डॉक्टर उपलब्ध करून देण्या करीता शिबिरात उपस्थित रुग्णांनी सहिष्णु फाऊंडेशन व सम्पूर्ण टीमचे आभार मानले.या शिबिरा मध्ये त्वचा रोग असलेल्या रुग्णांना सहिष्णू फॉउंडेशन मध्ये ऑनलाईन व्हिडिओ ओ पी डी द्वारे या डॉक्टरांकडून तपासनी केली जाहिल अशी हमी दिली गेली.

   सहिष्णु फाऊंडेशन ही ब्रह्मपुरी धर्मादाय संस्था ही जनतेच्या सहकार्य आणि देणगी वर अवलंबून आहे. ब्रह्मपुरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्या बद्दल नेहमी तत्परतेने काळजी करून, आरोग्यासाठी रोगनिदान व समुपदेशन केंद्र व फिजिओथेरपी केंद्र,दातांचा दवाखाना माफक दरात सहिष्णु फाऊंडेशन जुनी मदर्स पेठ स्कूल नागभीड रोड ब्रम्हपुरी या ठिकाणी करण्यात आहे. हा शिबिर सहिष्णू फॉउंडेशन आणि त्यांच्या टीम ने यशस्वीरित्या पार पाडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये