Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे इयत्ता 12 विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी आणि इंग्रजी विषयांच्या अभ्यासक्रमाबाबत विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये Prose Section, Poetry Section, Communication Skills आणि Novel Section कसे हाताळावे, तसेच परीक्षेच्या तयारीसाठी योग्य तंत्र कोणती यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शक म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे यांनी Novel Section चा अभ्यास कसा करावा आणि परीक्षेच्या तयारीसाठी प्रभावी उपाय कसे अवलंबावेत यावर विशेष भर दिला.

सदर सत्र तीन भागांमध्ये पार पडले असून कला, विज्ञान, व व्यवसाय शाखेतील एकूण 385 विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान उच्च माध्यमिक शिक्षक विवेक पाल, नरेन्द्र हेपट, व राकेश ठवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यांनी विद्यार्थ्यासाठी इंग्रजी टेस्ट सिरीज आयोजित करून विद्याथ्र्यांचा आत्मविश्वास व्दिगुणित केला.

विद्यार्थ्यांनी या सत्राद्वारे आपले अभ्यास कौशल्य वाढविण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याची प्रतिक्रिया दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये