Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

पोलीस विभाग, पोलीस स्टेशन बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथील श्री. हुसेन शहा, पोलीस उपनिरीक्षक यांचेविरूध्द ५०,०००/- रूपये लाच मागणी संबंधाने अॅन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने आज दि. १३/०१/२०२५ रोजी कार्यवाही केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, याशील तकास्वार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांचे लाकुड, बांबु, तेंदुपत्ला इत्यादी मालावर कमिशन आकारून एका जागेवरून दुसऱ्या आगेवर ट्रकने माल पोहचविण्याचे काम करतात. ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान तावार यांनी १९,०२,०००/- रूपयाचा तेंदुपत्त्याचा माल गडचिरोली जिल्हयातुन चंद्रपूर जिल्हयातील बामणी येथे पोहचविलेला होता. त्या मालाचे त्यांचे एकुण १९,०२,०००/- रू. हे व्यापाऱ्यांकडुन येणे बाकी होते. परंतु तीन-चार महिन्यांपासुन सदरचे व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते म्हणून तक्रारदार यांनी पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे लेखी तक्रार दिलेली होती. तेव्हा सदर १९,०२,०००/-रूची रक्कम व्यापाऱ्यांकडुन वसुन करून देणेकामी एकुण रक्कमेच्या वीस टक्के रक्कम (अंदाजे ३,८०,०००/- रू) बी मागणी केलेली होती.

तक्रारदार यांच्या सदर व्यवहारात नंतर सेटलमेन्ट होवुन त्यांना फक्त गुंतवलेली मुद्दल १६,१५,०००/- रु. व्यापाऱ्यांकडुन प्राप्त झाली. सदर व्यापारी व तक्रारदार यांच्यामध्ये समझोता होवुन सदर प्रकरण त्यांनी आपसात मिटवलेले होते. तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला व्यापा-यांविरूध्द दिलेला लेखी तक्रारअर्ज मागे घेत असल्याबाबत आरोपीत लोकसेवक श्री. हुसेन शहा, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. बल्लारशाह यांना सांगीतले असता आरोपी लोकसेवक यांनी दिलेला तकारअर्ज मागे घेण्याकरीता तक्रारदारास वारंवार फोन करून पैश्याची मागणी करीत होते. तसेच वरिष्ठांकडुन खोट्‌या गुन्हयात अडकविण्याची भिती दाखवित होते. त्यामुळे तंकारदार यांनी होणाऱ्या मानसिक त्रासाला वैतागुन दि. ०८/०१/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे येयुन दिनांक तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीवरून वेळोवेळी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपीत लोकसेवक श्री. हुसेन शहा, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. बल्लारशाह यांनी तक्रारदार यांचेसोबत तडजोड करून ५०,०००/- रू. घेण्याचे मान्य केले. त्यावरून आज दि. १३/०१/२०२४ रोभी सापळा कार्यवाही आयोजीत करून तक्रारदार यांना पंवारह लाचरक्कम घेवुन आरोपी लोकसेवक यांचेकडे पाठविण्यात आले असता आरोपी लोकसेवक यांना संशय आल्याने घटनास्थळावरून पळून गेले. त्यावरून आज दि. १३/०१/२०२४ रोजी आलोरो श्री. हुसेन शहा, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. बल्लारशाह यांचेविरूध्द लाच मागणीवरून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असुन आलोसे हे मिळून येताच अटक करण्याची तजविज ठेवण्यात आलेली आहे.

सदरची कार्यवाही श्री. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरबुले, सफी रमेश दुपारे, पो. हवा. हिवराज नेवारे, पो. हवा. अरूण हटवार, पो. हवा. नरेशकु‌मार नन्नावरे,, पोशि वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदिप तीहाम, राकेश जांभुळकर, म.पो.शि. मेधा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, चापोशि सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर तसेब बापोशि संदीप कौरोसे, मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली आहे. हॅक्ष हॅल्यु घेण्यात आलेली आहे.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंया त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर की व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय नागपूर दुरध्वनी क्रमांक – ०७१२-२५६१५२०

डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र.वि. नागपूर

श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक – ०७१७२-२५०२५१, १०६४

श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर :- ९३२२२५३३७२

श्री. जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर

Website: www.acbmaharashtra.gov.inपोलीस

८८८८८५७१८४

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये