Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

खाली ट्रॅक्टर वरती अवैद्य रेती वाहतुकीचा गुन्हा दाखल

टॅक्टर चालक - मालकाची पत्र परिषदेत माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

  खाली ट्रॅक्टर ट्रॉलीसह तुरी आणण्याकरता शेतात जात असताना महसूल कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने ट्रॅक्टर पकडले व तहसील कार्यालयात लावले. ट्रॅक्टरमध्ये रेती नसताना सुद्धा अवैद्य रेती वाहतुकीचा गुन्हा दाखल करून माझेवर कारवाई केली. असा आरोप ट्रॅक्टर मालक रोशन रामटेके यांनी पत्र परिषदेत केला.

 दिनांक ७ जानेवारीला रात्र ९ वाजता शेतात धान आणण्याकरिता जात असता सुमठाणा येथे भद्रावती मंडळ अधिकारी वाटेकर यांनी माझे ट्रॅक्टर एम एच ३४ एल ९३३२ अडवून जबरदस्तीने ते तहसील कार्यालयात लावले.

याबाबत त्यांनी तहसीलदारांना सूचना देऊन अवैद्य रेती वाहतुकीचा गुन्हा दाखल केला. माझ्या ट्रॅक्टरमध्ये रेती, फावडे व घमिले असे काही नसताना सुद्धा अवैध रेती वाहतुकीचा गुन्हा दाखल करून माझेवर १ लाख १५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. या चुकीच्या कारवाई विरोधात आपण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे रामटेके यांनी सांगितले. यासंदर्भात माझ्याकडे व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि सकाळी वाहतूक परवानाने रेती वाहतूक केल्याचा पास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तहसीलदार राजेश भांडारकर यांनी माझेवर केलेली ही कारवाई अन्यायकारक असल्याचे मत रोशन रामटेके यांनी यावेळी व्यक्त केले.

हे प्रकरण मी शेवटपर्यंत नेणार आणि स्वत:ला निर्दोष असल्याचे सिद्ध करेल असेही त्यांनी यावेळी शेवटी सांगितले. या पत्र परिषदेला चालक बाळकृष्ण गळमळे, मालक रोशन रामटेके उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये