भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा आयोजित “रन फॉर बचपन” – वाकेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट
स्थानिक भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीच्या वतीने दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी सात वाजता बालकांपासून तर ज्येष्ठ वयोवृद्धांनी त्यांच्या बालपणातील आठवणींना उजाळा देण्याकरिता तसेच एक दिवस लहानपणाचा अनुभव घेण्याकरिता “रन फॉर बचपन”- या बिरूदाने “वाकेथॉन” स्पर्धेची सुरुवात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातून करण्यात आली.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती हे नाव शिक्षण, संशोधन, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातही आपल्या कर्तुत्वाने अर्धशतकापासून सुपारीचीत आहे उपरोक्त क्षेत्रात संस्था दरवर्षी अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते.
भद्रावती करांच्या सुदृढ आरोग्याच्या व राष्ट्र निर्मितीच्या उद्देशाने भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती मागील पाच वर्षापासून मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करीत असते. त्या सर्व स्पर्धांना भद्रावतीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
या वाकेथॉन स्पर्धेला भद्रावती व परिसरातील लहान मुले, मुली, सर्व शाळांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तरुण वर्ग, सर्व महिला वर्ग, भद्रावतीतील सर्व सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या स्पर्धेला सकाळी ७ वाजता भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती चे अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे , सचिव डॉक्टर कार्तिक शिंदे, सहसचिव डॉक्टर विशाल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक धनराज अस्वले, प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके, माजी प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे, प्राचार्य डॉक्टर सुधीर मोते व प्रशांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाकेथॉन स्पर्धेला सुरुवात झाले.
सदर स्पर्धा प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र बेदरे व श्री मिलिंद वेलेकर या दोन शिक्षकांना समर्पित करण्यात आले.
याप्रसंगी श्री अविनाश शिदमशेट्टीवार, श्री मोहित रॉय, श्री नकुल शिंदे, डॉक्टर प्रवीण केशवानी, श्री शेखर सिंग, श्री अजय आसुटकर, प्रवीण बंग, शेखर सिंग, श्री गुरुदेव सेवा मंडळ, लोकमत सखी मंच, व्यापारी असोसिएशन, जय हिंद फाउंडेशन, पतंजली योग डान्स ग्रुप, सायकलिंग ग्रुप, मॉर्निंगवॉक ग्रुप, माजी सैनिक ग्रुप इंदर वेस्ट ज्येष्ठ नागरिक संघ पत्रकार संघ डॉक्टर असोसिएशन एडवोकेट असोसिएशन जय हिंद फाउंडेशन, व परिसरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी महाराष्ट्राच्या प्रगती करिता व उत्तम आरोग्य करिता उपस्थितांच्या हस्ते हवेत रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
ही वाकेथॉन स्पर्धा लहान बालक तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातून ते जुने बस स्टॉप तसेच युवकांसाठी सुरुवात करून गवराळा गेट व परत अशी आयोजित करण्यात आली होती.
या वाकेथॉन स्पर्धेत ग्रुप मधून इंन्नर व्हील क्लब, बेस्ट कॉलेजमधून निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, वैयक्तिक उत्कृष्ट वेशभूषेसाठी प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे, मुलींमधून पूर्वी अतुल कोल्हे, मुलांमधून रक्षक घुबडे तसेच प्रोत्साहन पर नक्ष झाबळे, साई कातकर व रोहन बारसाकडे यांना सन्मानचिन्ह तसेच भेटवस्तू देण्यात आले.
या वाकेथॉन स्पर्धेचे संचालन प्राध्यापक डॉक्टर सुधीर मोते तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे यांनी केले.
या वाकेथॉन स्पर्धेला भद्रावती स्थित सर्व शाळा महाविद्यालय, सर्व सामाजिक संघटनांनी तसेच भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत सर्व शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर लहान मुलापासून, युवक, युवती, नागरिक, महिला, जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.