Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

कवठी येथे भव्य टेनिस बॉल नाईट क्रिकेट सामने

मा.खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

कवठी ग्रामपंचायत मार्फत ५० लाखांचा निधी मंजूर – मा.खा. अशोकजी नेते यांची विकास कामाची वचनबद्धता पूर्णत्वास 

कवठी येथील शेरकी पाटील यांच्या भव्य विशाल पटांगणावर जगदंब क्रीडा मंडळ कवठी (हेटी) यांच्या सौजन्याने “एक गाव, एक संघ” या अभिनव संकल्पनेतून भव्य टेनिस बॉल नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते फीत कापून व चेंडू टोलवून करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना मा.खा. अशोकजी नेते यांनी गावाच्या विकासासाठी आपले विशेष प्रेम आणि बांधिलकी व्यक्त करत म्हणाले “माझ्या राजकीय प्रवासात मला नेहमीच खेळ आणि विकास कार्याची सांगड घालण्याची संधी मिळाली आहे पंचांचा निर्णय अंतिम मानून खेळल्यास कोणतेही वादविवाद होणार नाहीत.”

ते पुढे उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले, “माझा पराभव झाला असला तरी ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी सदैव तत्पर राहिलो आहे.या गावावर माझे प्रेम कायम आहे. सावली तालुक्यातील अनेक गावांमध्ये माझ्या पुढाकाराने विकासकामे पार पडली आहेत. कवठी ग्रामपंचायती मार्फत मंजूर केलेला हा ५० लाख रुपयांचा निधी तसेच मुरलीधर महाराजांच्या स्थानी देवटोक हरणघाट येथे पंधरा लक्ष रुपयाचे सभागृह मंजुर करुन घेतलेला आहे.कवठी ग्रा.पं.ला गावाच्या विकास प्रगतीसाठी देण्यात आला.यामध्ये मंजूर निधीतील महत्त्वाची कामे:

१)शहीद सुरेश पाटील सुरकर हायस्कूलला संरक्षण भिंत – ₹१० लाख २)सिंगापूर येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण – ₹१० लाख

३)रुद्रापूर स्मशानभूमीतील सीसी रोड – ₹१० लाख ४) घनश्याम घोटेकर, मंदाबाई, दागोजी घोटेकर ते विजय भोयर यांच्या घरापर्यंत रस्ता – ₹१० लाख ५)स्मशानभूमी रस्त्याचे बांधकाम – ₹१० लाख याचा वापर चांगल्या प्रकारे करावा अशी माझी अपेक्षा आहे.”

 ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्याची बांधिलकीही यावेळी स्पष्ट करताना म्हणाले मागील वर्षी क्रिकेटच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या संरक्षण भिंतीच्या मागणीचा शब्द पूर्ण केल्याचे सांगत “ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. माझा पराभव झाला असला तरी गावकऱ्यांचे सहकार्य आणि पाठिंबा याबद्दल आभार व्यक्त करतो. “मी आपल्या तालुक्यावर विशेष प्रेम आहे भविष्यातही विकास कामे थांबू देणार नाही. कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी उभा असेन,” असे ते म्हणाले.

अध्यक्ष स्थानावरून माजी आमदार प्राध्यापक अतुल भाऊ देशकर यांनी बोलताना, क्रीडांगणाची स्पीच फुलांचा सुगंध, पाहायला या ठिकाणी मिळाला जीवनात खेळ हा विभाज्य अंग आहे खेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधता येतोय.अंडर आर्म हा खरं क्रिकेट नसतो फुल स्पीचचा आनंद हा वेगळाच असतो.रस्त्याच्या विकासासंबंधी

मुर्लिधर महाराजांनी जे वक्तव्य केले ,त्यासाठी मी व नेते साहेब आम्ही पुढाकार घेऊपण तीन हजार लोकांनी समस्या घेऊन जमले पाहिजे त्यासाठी आम्ही पुढे येऊ आपण धर्म प्रसारांनी याचा पुढाकार घ्यावा.खेळातून शिस्त शिकायला मिळते या माध्यमातून आपण एकत्र येऊन भेटतोय व कार्यकर्त्यांची भेटी होतात याचा आनंद सुद्धा मिळतो असे व्यक्तव्य यावेळी केले.

सामाजिक नेते देविदास बानबले यांनी उद्घाटन प्रसंगी ,या खेळाला शुभेच्छा दिल्या या गावावर सुद्धा माझा विशेष प्रेम आहे या ठिकाणी मला प्राचारण केलं माझा सन्मान केलं त्याबद्दल या गावांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो असे व्यक्तव्य यावेळी केले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने तालुकाध्यक्ष अर्जुनजी भोयर, ता.महामंत्री सचिन सा. तंगडपलीवार,संत मुर्लिधर स्वामी महाराज गडचिरोलीचे जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सरपंच कांताताई बोरकुटे, उपसरपंच राकेश घोटेकर, जेष्ठ नेते दौलतराव भोपये,देवराव चिताडे,डोपाजी पा.बट्टे, निखिलभाऊ सुरमवार, तसेच

जगदंब क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर बोरकुटे व त्यांचे सहकारी मंडळ पदाधिकारी व अन्य मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या उदघाटन कार्यक्रमाला विद्यार्थिनी डान्स, लेझीम, ढोल ताशांच्या व फटाकेच्या आतिषबाजीने तसेच फुलांनी ग्राऊंड सजावुन उत्साही वातावरणात मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थ व पाहुण्यांच्या जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये