Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

बेलदार समाज बल्लारपूर तर्फे भव्य रक्तदान शिबीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री समाज भूषण कर्मवीर स्व.श्री.मा.सा.कन्नमवार यांनी समाजासाठी केलेले कार्य,त्याग आणि समर्पण, विकासाच्या दृष्टीने उचललेले पाऊल आज महाराष्ट्राच्या प्रगतीची साक्ष देते.आज त्यांचा शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव संपूर्ण विदर्भात साजरा होतोय.बेलदार समाज सेवा कल्याण समिती बल्लारपूर तर्फे ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबीर व रुग्णांना फळं वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक श्री घनश्यामजी मुलचंदानी माजी नगराध्यक्ष,नगर परिषद बल्लारपूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ श्री सुनीलजी कुल्दीवार, माजी उपाध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर, मुख्य अतिथी श्री रविंद्रजी भंडारवार उपमुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, श्री सतिशजी गोर्लावार उप अभियंता महाराष्ट्र राज्य जिवन प्राधिकरण विभाग बल्लारपूर, समितीचे अध्यक्ष श्री श्रीनिवासजी बुग्गावार,प्रा. श्री नागेश्वरजी गांडलेवार आदिंची मंचावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी दादासाहेबांच्या जिवन चरित्रावर मार्गदर्शन केले व रक्तदान हे श्रेष्ठ दान हि सामाजिक बांधिलकी जपत समाजातील ३५रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी रक्त पेढी चंद्रपूर व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय स्टाफने मोलाचं सहकार्य केले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समितीचे पदाधिकारी सचिव श्री सुनीलजी बोप्पनवार, उपाध्यक्ष श्री उमेश कोलावार, सहसचिव श्री विलासजी बेझलवार, सदस्य श्री भास्करराव तेल्लावार, शंकरराव पुलगमवार, गणेश तोटेवार, ईश्वर नेरडवार,परीस महाजनवार राजेश मारशेट्टीवार, राकेश अडगुळवार, साईनाथ जिलकरवार, डॉ परेश कुल्दिवार,शुभम गांडलेवार, किशोर पुसलवार, रविकांत पुप्पलवार, सुरेश नायडू, संजय नेरलवार, संकेत नायडू, सुनील बोंतलवार, साईनाथ गाजरेडीवार, रमेश नायडू,श्रिनीवास चेरकुतोटावार, सदानंद बुध्दार्थी,सौ मिनाताई कुल्दीवार,सौअश्वीनीताई बुग्गावार,सौ सविताताई बोप्पनवार,सौ रेखाताई बेझलवार,सौ श्रिलता चेरकुतोटावार,सौ उमा नायडू, डॉ सौ रेणुका कुल्दीवार आदींनी परिश्रम घेतले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये