पोलीस स्टेशन वर्धा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोरीचे एक मोपेड व दोन मोटरसायकल असे तीन गुन्हे केले उघड
संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आम्ही पोलीस हवालदार प्रशांत वंजारी पोलीस स्टेशन वर्धा शहर असे सोबत असलेल्या पोलीस स्टॉपसह पोलीस नाईक नरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार असे पोस्टे परिसरात चोरी गेलेल्या मोपेड दुचाकी व चोरी करणाऱ्या चोरटा याचा शोध घेत असताना मुखबीर मार्फत खबर मिळाली की.,
तक्रारदार विलास रामदास लोटे राहणार भीम नगर वर्धा पेट्रोल पंपाजवळ यांची मालकीची जुनी वापरती हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH 32 L 2585 कि.15,000 रुपये ही त्यांचे घराच्या आवारातून हँडल लॉक तोडून चोरी केली आहे व ती एका अल्पवयीन बालकाने चोरी केल्याने त्यास त्याच्या वडीला समोर विचारपूस केली असता त्याने सांगितले की मी ही गाडी चोरी केली असून त्या अगोदर एक होंडा फॅशन गाडी सुद्धा भीम नगर वर्धा येथून चोरी केली आहे तसेच एक लाल रंगाची मोपेड गाडी सुद्धा धंतोली रहाटे कॉलनी मेट्रो पार्किंग नागपूर शहर इथून चोरी केली आहे नमूद गाड्या बाबत त्याला अधिक विचारपूस केली असता त्याने सांगितले की दोन गाड्या मी एका कॉलेजची फी भरायची आहे असे खोटे बोलून दिले असून एक्टिवा गाडी नादुरुस्त असल्याने एका गॅरेजमध्ये दुरुस्ती करता टाकली आहे माझ्याजवळ पैसे नसल्यामुळे ते मी त्या गॅरेज मदती होंडा एक्टिवा घेणे करता गेलो नाही अल्पवयीन बालकाने सांगितल्याप्रमाणे आम्ही दोन मोटरसायकल असलेल्या इसमाचा तसेच गॅरेज मालकाचा शोध घेतला असता, दोन मोटरसायकल त्या इसमांकडून तसेच एक लाल रंगाची मोपेड गॅरेज मालका कडे मिळून आल्याने त्या गाड्या बाबत पोलीस स्टेशन गुन्हे अभिलेखा वरून माहिती घेतली असता.,
भीम नगर तनिका रेस्टॉरंट इथून मोहम्मद कुरेशी राहणार समता नगर वर्धा यांच्या मालकीची होंडा पॅशन क्रमांक एम एच 32 एक्स 7963 कि 40,000 रुपये ही गेल्या आठ महिन्यापूर्वी चोरी केल्याचे समजले तसेच मोपेड होंडा एक्टिवा लाल रंगाची क्रमांक एम एच 49 बी क्यू 4547 कि 70,000 रुपये पोलीस स्टेशन धंतोली नागपूर शहर इथून चोरी केल्याचे तसेच त्याबाबत पोलीस स्टेशन नागपूर येथे धंतोली पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद आहे दोन पंचा समक्ष वरील दोन्ही मोटरसायकल मोपेड असा एकूण जुमला किंमत 1,25,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई हि माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन सर, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे सर उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा विभाग प्रमोद मकेश्वर सर यांच्या निर्देशाप्रमाणे मा.पोलीस निरीक्षक पराग पोटे ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे मार्गदर्शनात सपोनी विकास गायकवाड सर, गुन्हे प्रगटीकरणाचे पथकाचे प्रमुख पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, किशोर पाटील, शैलेश चापलेकर, पोलीस नाईक नरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, अविनाश निंबाळकर,श्रावण पवार, योगेश ब्राह्मण चालक पीएसआय गजानन जाचक सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली