ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रॉयल बुध्दीझम मॅट्रिमोनी आयोजित वर वधू परिचय मेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- मुला मुलींचे विवाह जुळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी दिनांक १९ नोव्हेंबरला रॉयल बुध्दीझम मॅट्रिमोनी तर्फे बौध्द ध म्मीय वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन एड. नंदा फुले यांच्या हस्ते करण्यात आले.

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. स्निग्धा कांबळे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रशांत डांगे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता, एड.आशिष गोंडाने अनुकूल शेंडे हे होते. या मेळाव्यात अमरावती नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आदी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती.राजेश मेश्राम यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या रॉयल बुध्दीझम मॅट्रिमोनी च्या स्तुत्य उपक्रमास उत्स्पूर्त प्रतिसाद मिळाला मान्यवरांनी आणि उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मार्गदर्शन प्रशांत डांगे यांनी केले तर संचालन पदमाकर रामटेके यांनी तर उपस्थितांचे आभार नरेश रामटेके यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डेव्हिड शेंडे,रक्षित रामटेके, मनोज धनविज, भारत मेश्राम, जयंत शेंडे,
यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये