तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक
घमाबाई माध्यमिक निवासी आश्रम शाळा तांडा येथे परपडली विज्ञान प्रदर्शनी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
दि.८ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२५ पर्यंत तालुक्यातील घमाबाई माध्यमिक निवासी आश्रम शाळा,तांडा येथे नुकतेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीमध्ये स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,चोरा या शाळेचा आदिवासी माध्यमिक विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. वृषभ नंदू डांगे या विद्यार्थ्याने डी सी जनरेटर हे मॉडेल बनविले. डीसी जनित्र एक विद्युत यंत्र आहे जे यांत्रिक ऊर्जेचे थेट प्रवाह विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करते. या प्रतिकृतीचा उपविषय इमर्जिंग टेक्नॉलॉजी हा होता. उदयोन्मुख तंत्रज्ञान म्हणजे अशी नवीन विकसित होणारी तंत्रज्ञान होय. या विद्यार्थ्याला एच.टी.येलकर व एम. एस.वाकडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित धनाजी नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तुकाराम पवार, डॉ.प्रकाश महाकाळकर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, भद्रावती, आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शक शिक्षक एच.एन.येलकर यांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
विजय विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे,सहसचिव डॉ.विशाल शिंदे, डॉ. जयंत वानखेडे, प्राचार्य एम.एस.ताजने व सर्व शिक्षक वृंदांनी विजेता विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



