ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरीत ‘रंगिलो रास २०२६ – सीझन ४’चा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी : सार्वजनिक नवरात्र उत्सव समिती, ब्रम्हपुरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या *‘Rangilo Raas 2026 – Season 4’* या भव्य गरबा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व थाटात पार पडला.

या महोत्सवाचे उद्घाटन ब्रम्हपुरीतील प्रतिष्ठित उद्योगपती मा. निलेश मोहोता व ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मा.गौरवजी भैया यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कृष्णाजी सहारे होते. यावेळी ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे माजी सभापती विलासजी विखार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उद्घाटन सोहळ्याला नगरसेवक मनोज भूपाल, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीशजी कावळे, मा. सिद्धेश्वरजी भर्रे,मा.सुरेशजी दर्वे, मा.प्रशांतजी ताम्हण ,मा. रवीजी रणदिवे, अक्षयजी चहांदे, गणेशजी पिल्लारे, प्रशिकजी कामडी, सागरजी हर्षे, सुशीलजी थारकर,शुभम राऊत,चिंतामण जोशी, विवेक गरफडे व माशुरकर सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवांतर्गत *११ ते १९ ऑक्टोबर २०२६* या कालावधीत सलग नऊ दिवस आणि नऊ रात्री भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ७ वाजल्यापासून गरब्याचा उत्साह रंगणार असून, १५ ऑक्टोबर रोजी विशेष गरबा ग्रुप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवामुळे ब्रम्हपुरी शहरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक गरबा नृत्याच्या माध्यमातून नागरिकांना सांस्कृतिक आनंद घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या महोत्सवात नागरिकांनी, युवक-युवतींनी तसेच गरबाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक नवरात्र उत्सव समिती, ब्रम्हपुरीच्या वतीने करण्यात आले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये