ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहबाळा गावात समस्यांचा मळा : मुख्य रस्ताच नाही, ग्रामस्थांचे हाल बेहाल

आजारी रुग्णांना खाटेवरून न्यावे लागते दवाखान्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 *महिलांचा तहसीलदारांना सवाल, आम्ही या देशाचे नागरिक नाही का?*

       भद्रावती शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोहबाळा गावात समस्यांचा डोंगर उभा आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या या गावातील ग्रामस्थांना मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी धड पायवाटही उपलब्ध नसल्याची गंभीर परिस्थिती आहे.

रस्ता नसल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सर्वांत गंभीर बाब म्हणजे आजारी रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही गावात पोहोचू शकत नाही. त्यामुळे काही वेळा रुग्णाला चक्क खाटेवर उचलून न्यावे लागते.

या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

अखेर आज, १२ ऑक्टोबर रोजी शिंदे शिवसेनेचे सुरज शहा यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आणि ग्रामस्थांनी तहसीलदार गोविंद पानमंद यांना निवेदन देऊन तातडीने रस्त्याची व्यवस्था करण्याची मागणी केली.

आम्ही या देशाचे नागरिक नाही का? आम्हालाही मूलभूत सुविधा मिळण्याचा अधिकार नाही का? असा संतप्त सवाल शालू टेकाम, मेघा चौधरी, राहुल चौधरी, शोभा मारेकर, कांता कापसे आदी इतर महिलांनी उपस्थित केला आहे.

आता तरी प्रशासन जागे होऊन मोहबाळा गावातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये