ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी भद्रावती तहसील कार्यालयाची धडक कारवाई

मुद्देमालासह वाहन ताब्यात : पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        भद्रावतीचे तहसीलदार संदीप पानमंद यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने नियुक्त झालेल्या अप्पर तहसीलदार सोनाली तेटगुरे यांनी समयसूचकता दाखवत मौजा घोडपेठजवळ चंद्रपूर-नागपूर मार्गावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली.

महसूल विभागाच्या पथकाने वाहन क्रमांक एमएच ४० बीजी ६९३५ या हायवा ट्रक वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरीत्या वाहतूक केली जात असलेली रेती आढळून आली. या प्रकरणी वाहनचालक शेख इम्रान शेख दाऊद, रा. अपनी बेकरी, अमरावती, वय ४२ वर्षे, याला ताब्यात घेण्यात आले असून वाहन व रेती जप्त करण्यात आली आहे. संबंधिताविरुद्ध फौजदारी तसेच दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल प्रशासनाकडून विशेष पथके नेमण्यात आली आहेत. अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी नियमित तपासणी व कारवाई करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार संदीप पानमंद यांनी दिली.

सदर कारवाईत सहाय्यक महसूल अधिकारी देवानंद गावंडे तसेच भरारी पथकातील सदस्यांनी सहकार्य केले. गौण खनिज वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या व शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत अप्पर तहसीलदार सोनाली तेटगुरे यांनी दिल्याचे दिसून येत आहे.तसेच अवैध पने गौण खनिज उत्खनन, वाहतूक, यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये