Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स येथे दिनांक 30 डिसेंबर 2024 ला माजी विद्यार्थी मेळाव्या चे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदुर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे उपाध्यक्ष श्री विठ्ठलराव थिपे, सचिव श्री धनंजय गोरे तसेच सदस्य संचालक श्री रामचंद्र सोनपित्रे आणि कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटना समन्वयक प्रा रामकृष्ण पटले यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन ग्रंथालयाचे विभाग प्रमुख प्रा मनोहर बांद्रे यांनी केले. मान्यवरांनी सांगितले की महाविद्यालयाच्या विकासासाठी माजी विद्यार्थी किती महत्त्वाचा असतो आणि कशाप्रकारे त्यांचे अनुभव आणि सल्ले आपल्या महाविद्यालयाच्या विकासामध्ये अत्यंत उपयुक्त ठरतात. माजी विध्यार्थी श्री गिरसावळे, सुमित पांडे, अविनाश बोरकर, व कु. अस्मिता वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेऊन सांगितले की विद्यार्थ्यांनी सतत शिक्षण घेत राहावे आणि शिक्षकांचे आभार मानावे.

भावी आयुष्यातील जीवनात शिक्षकांचे मार्गदर्शन किती उपयोगी पडतात याचे महत्व पटवून दिले.त्याचप्रमाणे माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे विकासामध्ये अजून काय करू शकतो त्याबद्दल सांगितले जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी महाविद्यालयाच्या मार्फत विद्यार्थ्यांना पुरवून त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. या प्रसंगी धनंजय गोरे , विठ्ठलराव थिपे यांचे समायोचित मार्गदर्शन लाभले.शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेंद्र देव यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षिय भाषणातून मुलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये