गोवंश तस्करीविरुद्ध मोठी कारवाई
४५ गोवंश जनावरे व १९ लाख १८ हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपुर) : 23 डिसेंबर 2024 रोजी, चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोलिंगदरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेला ट्रक क्रमांक CG 24 S-2672 मध्ये गोवंश जनावरे कत्तलीसाठी घुग्घुसकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. धानोरा फाटा येथे नाकाबंदी करून ट्रक थांबवला असता, त्यामध्ये ४५ गाई व बैल आढळले. जनावरे दाटीवाटीने भरलेली होती व त्यांचे पाय बांधून त्यांची वाहतूक केली जात होती. ट्रकसह एकूण १९,१८,००० रुपयांचा माल जप्त करूं. दोन आरोपींना घुग्घुस पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. ४५ नग जनावरे एक गोशाळा, दाताळा येथे हलवण्यात आली.
घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली. ही कारवाई गोवंश तस्करी रोखण्यासाठी महत्त्वाची ठरली असून, जनावरांच्या संरक्षणासाठी कठोर पाऊले उचलण्याचा संदेश दिला आहे.