Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

समर्थ कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय किसान दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

       डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषि महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे भारताचे माजी प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला.

       या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे होते, प्रमूख पाहूणे म्हणून प्रा मोहजितसिंह राजपूत, रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा किरण ठाकरे, प्रा विलास सातपुते यांनी प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. 2001 मध्ये, भारत सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ 23 डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून घोषित केला होता.

        भूतपूर्व प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह यांचे शेतीसाठी असलेले योगदान व कृषी शिक्षणात त्यांचा असलेला सहभाग याविषयी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ नितीन मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच उपस्थित मान्यवरांनी देखील प्रसंगी आपले मनोगत वक्त करत कृषिदूत व कृषिकन्याना शेती व शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने कार्य करण्याचे आवाहन या प्रसंगी केले.

    या कार्यक्रमास प्रा सचिन सोळंकी, प्रा विजय पवार, प्रा विकास म्हस्के, प्रा संदीप टेकाळे, रा से यो स्वयंसेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये