Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पिंपळनेर गिरोलि रोड वर असलेली बीजप्रक्रिया कंपनी तात्काळ बंद करा – शेतकऱ्यांची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा हद्दीतील पिंपळनेर – गिरोली खुर्द रोड लगत असलेल्या सरकीचे डीलेटींग/बीजप्रक्रिया/ऍसिडिक कंपनी तात्काळ बंद करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी तहसिलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या कडे निवेदन देऊन कऱण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, देऊळगाव राजा हद्दीतील पिंपळनेर – गिरोली खुर्द रोड लगत असलेल्या गट न 81येथे कौसर हाजी मो.कलंदर व मो. सईद हाजी मो. कलंदर यांनी सरकीचे डीलेटींग चे काम सुरू केले आहे, त्यामध्ये डीलेटिंग करतांना ऍसिड चा वापर मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे, व हे दुषित पाणी मोकळे जमिनीत सोडत असल्यामुळे त्या लगत असलेल्या विहीरी व बोअरवेल चे पाणी ऍसिडिक बनून काळे पडत आहे, ते पाणी पिण्यास योग्य नाही, ते पाणी पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहात जमिनीत वाहून येत असल्याने जमीन नापीक होत आहे, हे दुषित पाणी पावसाळ्यात जनावरे पितात व त्या मुळे जनावरे व वन्य प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे,या कंपनीला लागूनच असलेल्या गट न 61,62,63,64,66,67,74 मधील जमिनी वर विपरीत परिणाम होत असल्याने सदर कंपनी तात्काळ बंद करून न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, दुषित पाण्यामुळे शेतजमीन, वन्यप्राणी, पाळीव प्राणी यांचे नुकसान झाले तर आपणास सर्वस्वी जबाबदार धरले जाईल असे निवेदनात नमूद केले आहे, निवेदनावर शशिकला टकले, चंद्रकांत पिंपळे, डॉ. संतोष पापडे, कलावती तुकाराम खांडेभराड, राजु खांडेभराड, बालू खांडेभराड, राहुल खांडेभराड, डॉ मनोज बैरागी, रमेश खांडेभराड, भगवान खांडेभराड, विष्णू खांडेभराड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, निवेदनाच्या प्रती तालुका कृषी अधिकारी, मुख्याधिकारी, तलाठी, व ग्रामसेवक यांना देण्यात आल्या आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये